vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर विमानतळावर रुग्णाची विचारपूस

आषाढी वारीत प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा; मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर विमानतळावर रुग्णाची विचारपूस…

पंढरपूर प्रतिनिधी: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेल्या भाविकाला छातीत त्रास जाणवू लागल्याने त्यांच्यावर तातडीने उपचार करून एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूरला हलवण्यात आले. आषाढीवारीच्या इतिहासात एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे प्रथमच रुग्णावर उपचार करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेऊन आवश्यक उपचार करण्याचे निर्देश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.छत्रपती संभाजीनगर येथील भाविक बाळू आसाराम पडूळ (वय ५४) हे दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तीन रस्ता येथील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले व पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे पाठवले. उपजिल्हा रुग्णालयात त्यांचा ईसीजी काढण्यात आला. गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्यांना तातडीने सोलापूरला पुढील उपचारासाठी एअर ॲम्ब्युलन्सने पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांना सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे हृदयरोगतज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.

दरम्यान, रुग्ण बाळू पडूळ यांना एअर ॲम्ब्युलन्सने सोलापूर विमानतळावर आणल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळावर एअर ॲम्ब्युलन्समध्ये रुग्णाची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांकडून रुग्णाच्या उपचाराबत माहिती घेतली व आवश्यक वैद्यकीय उपचार करण्याच्या सूचना दिल्या

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल आदी उपस्थित होते.

आषाढी वारीत लाखो भाविक पंढरपूरला येत असतात. आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीची वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी यावर्षी राज्य शासनाने प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे गंभीर रुग्णांना तात्काळ मोठ्या रुग्णालयात हलवणे शक्य झाले आहे.

०००

संबंधित पोस्ट

आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी‘धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान’

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta

दिवेआगर येथे सुसज्ज ॲक्वेरियम उभारणीचा प्रस्ताव तातडीने सादर करा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी रोजी बिहार येथून होणार पी.एम.किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे निधी वितरण..

vishwatmaklokswamivarta

एचएमपीव्ही आजाराला घाबरून जावू नका, काळजी घ्यावी-सार्वजनिक आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचे आवाहन

जनतेची रेकॉर्डब्रेक उपस्थिती…  ‘विजयी संकल्प सभेमुळे’ संपूर्ण खरोळा नगरी झाली कमळमय…🪷

vishwatmaklokswamivarta