vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सोलापूरात भाजपला मोठा धक्का; 50 गावच्या सरपंच व उपसरपंचांचा BRS पक्षात प्रवेश

सोलापूरात भाजपला मोठा धक्का; 50 गावच्या सरपंच व उपसरपंचांचा BRS पक्षात प्रवेश…

 

सोलापूर प्रतिनिधी

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  यांच्या भारतीय राष्ट्र समिती  या पक्षाने महाराष्ट्रात पद्धतशीरपणे पाय पसरण्यास सुरुवात केली अशून तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या सीमे जवळील जिल्ह्यांना आता त्यांनी टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. 

सोलापुरातील राजकीय वातावरणात प्रवेश केला होता. शहरातील पूर्व भाग,उत्तर सोलापूर मतदार संघानंतर केसीआर यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे.  दक्षिण सोलापूर तालुक्यातील सचिन सोनटक्के यांनी जवळपास 60 वाहनांचा ताफा व दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावच्या सरपंचाना अशा एकूण 350 जणांना घेऊन हैदराबादकडे रवाना झाले आणि बीआरएस पक्षात प्रवेश केला

पक्ष प्रवेशामुळे सर्वात मोठा झटका हा भारतीय जनता पक्षाला बसला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील 38 गावातील विद्यमान सरपंच, 12 माजी सरपंच, 12 ग्रामपंचायत सदस्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदार संघातील सरपंच व नेते बीआरएसच्या पक्षात गेल्याने भाजपला जबरदस्त हादरा बसला आहे.

आगामी काळात सोलापुरात होणाऱ्या सर्वच निवडणूका बीआरएस पक्ष लढवणार असल्याची माहिती सचिन सोनटक्के यांनी बोलताना दिली.दक्षिण सोलापूर तालुक्यात शेतकरी वर्ग, मतदार हे विद्यमान भाजप आमदराला वैतागलेला आहे. बीआरएस हा पक्ष शेतकऱ्यांसाठी अनुकूल पक्ष आहे,असे सचिन सोनटक्के यांनी सांगितले. अशी ही बातमी लेटेस्ट बातम्यांमध्ये ही आलेली आहे

 

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील धरणात 152.78 दलघमी पाणीसाठा- पाच तालुक्यात 19 टँकरद्वारे पाणी पुरवठा- जिल्हा व तालुका प्रशासनाच्या उपाययोजना सुरु- पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

जालना जिल्ह्यात इंधनाचा मुबलक साठा-अफवांवर विश्वास न ठेवण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

वरदायनी माता मंदिर परिसरातील पूल धोकादायक स्थितीत; वाहतुकीस तात्काळ बंदी..

माजी आमदार अँड त्र्यंबकनाना भिसे यांचा मुख्यमंत्री मा देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश

vishwatmaklokswamivarta

जागतिक सायकल दिनानिमित्त केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी अर्बन अड्डा २०२५ ला उपस्थिती लावली आणि “सायकलिंग, चिल्ड्रन अँड सिटीज” आणि “रोड टू सायकल२स्कूल” या पुस्तकांचं केलं प्रकाशन.

उपसा सिंचन योजनेतून दुष्काळी भागाचे नंदनवन – जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील म्हैसाळ जत विस्तारित उपसा सिंचन योजनेच्या बोगदा कामाचा ब्रेकथ्रू .प्रकल्पातील दोन लाईनचे काम पूर्ण- ⁠दुष्काळी जत तालुक्यासाठी जीवनदायी