
सार्वजनिक कार्ये, उत्सव (गणेशोत्सव, दुर्गाउत्सव इत्यादी) साजरे सार्वजनिक न्यास नोंदणी वर्गणी गोळा करीत आहोत किंवा करणार याबद्दल विहीत नमुन्यात कळविणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे न कळविल्यास सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 67 अन्वये गुन्हा ठरतो, असे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे धर्मादाय उप आयुक्त डॉ. मनिष पवार
राज्य प्रतिनिधी सांगली, निरनिराळी सार्वजनिक कार्ये, उत्सव (गणेशोत्सव, दुर्गाउत्सव इत्यादी) साजरे करण्यासाठी सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत नसलेले मंडळ, संस्था, उत्सव कमिट्या जनतेकडून वर्गणी, देणगी रूपाने मदत गोळा करीत असतात. सार्वजनिक कार्य, उत्सव करणाऱ्या संस्था मंडळे, उत्सव समित्या यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 (क) अन्वये धर्मादाय उप आयुक्त, सांगली विभाग, सांगली सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, कृष्णाश्रय कॉम्पलेक्स, महावीर नगर, वखारभाग सांगली यांना वर्गणी गोळा करीत आहोत किंवा करणार याबद्दल विहीत नमुन्यात कळविणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे न कळविल्यास सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 67 अन्वये गुन्हा ठरतो, असे सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाचे धर्मादाय उप आयुक्त डॉ. मनिष पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.
कलम 41 (क) अन्वये ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया www.charity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासंबंधी माहिती संकेतस्थळावरील प्रणाली मार्गदर्शनमध्ये उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी अध्यक्ष व सचिव यांचे पॅनकार्ड व इतर सदस्यांचे ओळखपत्र (आधारकार्ड/ निवडणूक कार्ड/ वाहन चालक परवाना), मागील वर्षाचे हिशोब आणि या वर्षाचे हिशोब आणि या वर्षाचे अंदाजपत्रक (उत्सवाचा खर्च 5 हजार रूपये पेक्षा जास्त असल्यास सनदी लेखापालांकडून तयार करुन घ्यावेत). सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या परवानगीची प्रत (मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास), या वर्षापासून नव्याने कार्य / उत्सव साजरे करीत असल्यास नगरपालिका हद्दीतील मंडळांनी त्यांच्या भागातील नगरसेवकांचे (प्रथम वर्ष उत्सव साजरा करीत असलेबाबतचे) शिफारसपत्र व ग्रामीण भागातील असल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र आवश्यक आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, 1950 चे कलम 41 (क) अन्वये असणारी चौकशी ही न्यायीक स्वरुपाची असल्यामुळे अर्ज योग्य रीतीने सादर करणे ही अर्जदाराची जबाबदारी आहे. न्यायीक चौकशीमधील सार्वजनिक धर्मादाय आयुक्त यांचे आदेश पारित झाल्यानंतरच परवानगी देण्यात येते, तरी संबंधितांनी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत, असे आवाहनही डॉ. पवार यांनी केले आहे.
00000
एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटा प्रकल्पाअंतर्गत
रिक्त अंगणवाडी मदतनिस पदे भरण्यासाठी 2 सप्टेंबर पर्यंत अर्ज करा
सांगली, दि. 21, (जि. मा. का.) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटा प्रकल्पाअंतर्गत एकूण 13 महसूल गावातील 15 अंगणवाडी मदतनिस यांची रिक्त पदे भरण्यासाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ता धारक पात्र महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र महिला अर्जदारांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज दि. 2 सप्टेंबर 2024 पर्यंत एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटा कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.
गाव व कंसात अंगणवाडी केंद्रनिहाय रिक्त् अंगणवाडी मदतनिस पदे पुढीलप्रमाणे – वाळुज (23) – 01, घानवड (20) – 01, रेवणगाव (24) – 01, बलवडी (खा) (7) – 01, कुर्ली (10) – 01, कार्वे (11) – 01, नागेवाडी (17) – 01, बानुरगड (1) – 01, पळशी (2) – 01, सुलतानगादे (3) – 01, भाळवणी (68, 14, 15) – 03, बलवडी (भा) (12) – 01, वाझर (13) – 01.
अटी व शर्ती पुढीलप्रमाणे – अंगणवाडी मदतनिस पदासाठी सरळ नियुक्तीसाठी पात्र महिला उमेदवाराची वयोमर्यादा दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण व 35 वर्षाच्या आतील राहील. विधवा महिला उमेदवारासाठी ही वयोमर्यादा दि. 2 स्पटेंबर 2024 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी मदतनिस पदासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या महसुल गावची स्थानिक रहिवाशी असावी. या पदासाठी लहान कुटुंबाची अट लागू राहील. महसूल गावात एकापेक्षा जास्त पदे रिक्त असल्यास उमेदवारास एकाच ठिकाणी अर्ज करता येईल. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा सविस्तर तपशील दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत, पंचायत समिती व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
00000



