vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना प्रोत्साहन भत्ता रायगड जिल्ह्यासाठी 1.14 कोटींचे अनुदान मंजूर

अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना प्रोत्साहन भत्ता रायगड जिल्ह्यासाठी 1.14 कोटींचे अनुदान मंजूर

रायगड प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यात महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दि. 01 जुलै 2024 पासून लागू करण्यात आली आहे. योजनेअंतर्गत पात्र महिलांचे अर्ज नारी शक्ती दूत अॅप आणि लाडकी बहीण वेब पोर्टल वरून भरण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना देण्यात आली होती. यानुसार रायगड जिल्ह्यासाठी रु.1 कोटी 14 लाख 83 हजार 900 इतके अनुदान मंजूर झाले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रायगड-अलिबाग सुहिता ओव्हाळ यांनी दिली आहे.

आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या आदेशानुसार रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांना एकूण रु.1,14,83,900 (अक्षरी एक कोटी चौदा लाख त्र्याऐंशी हजार नऊशे) रुपयांचे प्रोत्साहन भत्त्याचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविका यांनी नारी शक्ती दूत अॅप आणि लाडकी बहीण वेब पोर्टल वर यशस्वीपणे नोंदवलेल्या 2 लाख 29 हाजर 184 अर्जांवर आधारित रु.50 प्रति अर्ज प्रमाणे रु.1,14,59,200/- अनुदान मंजूर. मुख्य सेविकांनी नोंदवलेल्या 494 अर्जांवर आधारित रु.50 प्रति अर्ज प्रमाणे रु.24,700 अनुदान मंजूर.

हे अनुदान तालुकानिहाय बाल विकास प्रकल्प अधिकारी (ग्रामीण/नागरी) यांच्या डीडीओ खात्यावर वर्ग करण्यात आले असून, जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकांच्या खात्यावर हे भत्ते वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे.

००००

संबंधित पोस्ट

S.S.C परीक्षेत नमुंमपा इटीसी दिव्यांग शिक्षण, प्रशिक्षण केंद्राचा निकाल १००%

मतदार याद्या अधिक अचूक आणि दोषमुक्त करण्यासाठी महाराष्ट्रात ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ मोहीम

हिंसा आणि खेळ एका वेळी होऊ शकत नाही; शाहरुख खानला क्षमा नाही !* – हिंदु जनजागृती समिती

vishwatmaklokswamivarta

आर्थिक क्षेत्रातील ‘हक्क न सांगितलेल्या मालमत्ता निपटारा’ मोहीम,नागरिकांसाठी उपयुक् -जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुंबई उपनगर जिल्ह्यात मोहिमेस उत्साहात सुरुवात…

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात अवैध मद्यविक्री विरोधात धडक मोहीम; ११० गुन्हे, १४.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांचे निधन