vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ..

 

जालना, प्रतिनिधी : इयत्ता 11 वी व 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाहभत्ता व इतर आवश्यक सुविधावर खर्च करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे.

या योजनेतंर्गत जालना महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमिटरच्या आत असलेल्या महाविद्यालयांमध्ये इयत्ता 11 वी 12 वी तसेच 12 वी नंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम मंजुर केली जाते. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2.50 लाखाच्या आत असणे अपेक्षीत आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यास 10 वी, 11 वी व 12 वी या अभ्यासक्रमास किमान 50 टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. तसेच अनुसूचीत जाती व नवबौध्द घटकातील दिव्यांगासाठी 10 टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. सदर विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती किमान 75 टक्के असणे अपेक्षीत आहे.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची व्याप्ती ही तालुका स्तरापर्यंत वाढविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्याचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र ऑनलाईन अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी इ. कारणामुळे विविध संघटना, पालक विद्यार्थी यांचेकडून सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील स्वाधार योजनेची तारीख वाढविण्याबाबत विनंती केलेली आहे. सन 2024-25 या वर्षासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईनद्वारे भरण्यात येत आहे. यापुर्वी दिलेल्या विहित मुदतीमध्ये ज्या पात्र विद्यार्थ्यानी अद्यापपर्यंत ऑनलाईनद्ववारे अर्ज केलेला नाही. अशा अनुसूचीत जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत दिनांक 15 मार्च 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याअनुषगांने अदयापपर्यंत ज्या विद्यार्थ्यानी स्वाधार योजनेचे अर्ज भरले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 15 मार्च 2025 पर्यंत https://hmas.mahait.org या पोर्टलवर अर्ज भरण्यात यावेत.

तसेच सन 2024-25 या वर्षात ऑनलाईन स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशील भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांचे बँक तपशील भरून घेण्याच्या अनुषगांने विद्यार्थ्यानी तात्काळ कार्यवाही करावी असे अवाहन सहायक आयुक्त, समाजकल्या, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

****

संबंधित पोस्ट

शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारण्यासाठी प्रशासन कटिबद्ध – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलशहीद जवानाच्या कुटुंबास एक कोटींची मदत ; गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

सोप्या गोष्टी अंगिकारून असह्य उन्हाळ्यात काळजी घेण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

राज्यपालांच्या उपस्थ‍ितीत मुंबई मॅरेथॉन २०२७ नोंदणीचा शुभारंभ

बांगलादेशमध्ये महिला आणि मुलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबाबत युनिसेफने ने तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी तसेच दोषींना शिक्षा होण्याची हमी देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले

मिशन शक्ती अंतर्गत पाळणा योजनेची राज्यात अंमलबजावणी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे कामगार व नोकरदार महिलांना मिळणार दिलासा

टीबी मुक्त भारत’ अभियान झोपडपट्ट्यांपर्यंत नेण्याचा राज्यपालांचा संकल्प