vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

आज,17 एप्रिलला गडचिरोलीत ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’आमदार अभिजित वंजारी यांच्या निधीतून ग्रंथालयांना पुस्तके आणि शाळांना संगणकांचे होणार

आज,17 एप्रिलला गडचिरोलीत ‘कर्तव्यपूर्ती सोहळा’आमदार अभिजित वंजारी यांच्या निधीतून ग्रंथालयांना पुस्तके आणि शाळांना संगणकांचे होणार वाटप…

 

गडचिरोली प्रतिनिधी: पदवीधर मतदारसंघातील आमदारांचा निधी शैक्षणिक उद्देशासाठी खर्च व्हावा या उदात्त हेतूने नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत गुरुवार 17 एप्रिल रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालय (कॅम्पस) परिसरातील नियोजन भवनात सकाळी 11 वाजता ‘कर्तव्यपूर्ती सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथालयांना पुस्तके आणि जिल्ह्यातील शाळांना संगणकांचे वाटप यावेळी करण्यात येणार आहे.

संगणक आणि मोबाईलच्या युगात ग्रंथालय ओस पडू लागली आहेत. विशेष म्हणजे ग्रंथालयात गेल्या कित्येक वर्षांपासून तीच ती जुनी पुस्तके आहेत. आजच्या काळाची गरज ओळखून जागतिक घडामोडी, तंत्रज्ञान, आधुनिक साहित्य, युवांसाठी करियरच्या नव्या संधी आणि वाटा या विषयावरची अर्थात आधुनिकतेची गरज ओळखून आवश्यक असलेली पुस्तके जिल्ह्यातील ग्रंथालयांना आमदार अभिजित वंजारी आपल्या आमदार निधीतून देणार आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या तांत्रिक आणि संगणकीय ज्ञानात भर घालण्यासाठी जिल्ह्यातील काही निवडक शाळांना आमदार निधीतूनच संगणकांचे वाटप करण्यात येणार आहे. आमदार अभिजित वंजारी यांनी पदवीधर मतदारसंघात निवडून आल्यानंतर ही अभिनव संकल्पना मांडली आणि पहिल्या वर्षांपासून हा उपक्रम सुरू करून अंमलबजावणी केली. याअंतर्गत यावर्षी ‘कर्तव्यपूर्ती सोहळ्या’चे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी असतील. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विश्वजित कोवासे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहरराव कोरेटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. सदर कार्यक्रमाला शैक्षणिक क्षेत्राशी आणि ग्रंथालयाशी संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

….000000

संबंधित पोस्ट

यलो अलर्ट; सोजिल्ह्यातसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

जिल्ह्यातील ‘विशेष कार्यकारी अधिकारी’ रद्द महिन्याभरात नवीन नियुक्त्या

अंतराळ संशोधन संस्थेतील शैक्षणिक सहलीसाठी  348 विद्यार्थ्यांनी दिली निवड चाचणी परीक्षा…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांची दहशत सुरुच, आता तीन कुत्र्यांचा चिमुकलीवर हल्ला; डोळ्याला आणि डोक्याचा चावा..

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एल्डर लाईन १४५६७’ हेल्पलाइन· मदतीसाठी टोल फ्री सेवा उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta

स्मशानभूमी समस्या निवारण अभियान मे अखेर जिल्ह्यातील स्मशानभूमी समस्यामुक्त करण्याचा निर्धार..