vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

विद्यार्थ्यांनी सर्व विषयांमध्ये ज्ञानक्षम व्हावे- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री  यांनी सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांचे केले स्वागत..

सातारा प्रतिनिधी : शाळा संस्कार घडविणारे मंदिर असून या मंदिरात शिक्षक हे देशाची उज्वल भावी पिढी घडवित असतात. विद्यार्थ्यांनीही कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती यांसह सर्व विषयांमध्ये संपूर्ण ज्ञानक्षम होण्यासाठी शिक्षकांना प्रतिसाद द्यावा. विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करुन मोठे व्हावे व देशाचा तसेच राज्याचा नावलौकीक वाढावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

  सातारा तालुक्यातील कोडोली जिल्हा परिषदेच्या प्राथमिक केंद्र शाळेत शाळा प्रवेशोत्सव 2025-26 चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत ‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या शाळेचेही उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले. यावेळी आमदार महेश शिंदे, आमदार मनोज घोरपडे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर आदी उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी विविध उपक्रम राज्यशासन राबवित आहे. या शाळांमधील विद्यार्थी उच्च पदावर काम करित आहेत. माजी राष्ट्रपती स्व. ए.पी.जी. अब्दुल कलाम, राष्ट्रती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानींही शासकीय शाळांमध्ये शिक्षण घेतलेले आहे. शासनाचा आनंददायी शिक्षणावर भर आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही दबाव न घेता शिक्षणाबरोबर खेळावरही भर दिला पाहिजे. सातारा जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘माझी शाळा आदर्श शाळा’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. शिक्षण विभागात अमुलाग्र बदल केले आहेत यामध्ये विद्यार्थ्यांचे दप्ताराचे ओझे कमी करणे, आनंददायी शिक्षण, मुलींना उच्च शिक्षण मोफत यासह अनेक योजना राज्य शासन राबवित आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघर्ष करा व संघटीत व्हा असे सांगतले होते. त्यांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर देशाचा कारभार चालत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विद्यार्थी स्पर्धांमध्ये टिकले पाहिजेत, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, असे आवानही उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी साधला चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद

  कोडोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले. मुलांनी खूप अभ्यास करा, मोठे व्हा, असे आवाहन करुन आपण भविष्यात काय होणार यासाठी आत्तापासून तयारी करा, असे उपमुख्यमंत्री श्री. शिंदे सांगितले.

यावेळी आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास शिक्षक, पालक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

गुरुपौर्णिमे निमीत्त दत्त मंदीर येथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते महाआरती

विधानपरिषद प्रश्नोत्तर :एच. आर. महाविद्यालयातील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत- नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

महिला व बालकांसाठीच्या संरक्षण, प्रतिबंधात्मक कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करा    – जिल्हाधिकारी संतोष पाटील

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉल चे वाटप

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पारदर्शक तपास सुरु- रुपाली चाकणकर – राज्य महिला आयोग

vishwatmaklokswamivarta

उन्हाळी सुट्टीतही जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थांना मिळणार अध्ययनाचे धडे..

vishwatmaklokswamivarta