vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी साधला संवाद; सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचे दिले निर्देश

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून सणसर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पूरग्रस्त भागातील नागरिकांशी साधला संवाद; सणसर येथील ओढ्याचे खोलीकरण करण्याचे दिले निर्देश..

पुणे, प्रतिनिधी: सणसर गावात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली; पूरग्रस्त भागातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. प्रशासनाने तालुक्यात झालेल्या नुकसानाचे पंचनामे करुन बाधितांना तातडीची मदत करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीची माहिती मंत्री श्री. भरणे यांनी उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याकडून घेऊन ते म्हणाले, सणसर येथील ओढ्याला पूर येऊन लोकवस्तीत पाणी शिरल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेल्या वस्त्यांतील नागरिकांना मदत करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावी.

पुरामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे. नागरिकांची ओढा खोलीकरणाची मागणी विचारात घेता, त्यांना होणारा त्रास कमी करण्याकरिता प्रशासनाने लवकरात लवकरात ओढ्याचे खोलीकरण काम करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश मंत्री भरणे यांनी दिले.

यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, गटविकास अधिकारी सचिन खुडे, तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे, संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

पैठण येथे पर्यटन स्थळांना सुविधा तयार कराव्यात : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी ‘सुलभ ‘चा महत्त्वपूर्ण पुढाकार भारतातील मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनावर व्यापक अहवाल प्रकाशित 

vishwatmaklokswamivarta

जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

महास्ट्राईड’ उपक्रमात सांगली जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले जिल्हाधिकाऱ्यांसह यंत्रणांचे अभिनंदन- सांगली जिल्हा राज्यात चौथा तर पुणे विभागात तिसरा- जिल्ह्याला 16 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मंजूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभभारत विकासाच्या अमर्याद संधींचा – उपराष्ट्रपती जगदीप धनखडप्राप्त ज्ञानाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी व्हावा-राज्यपाल राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta