vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेशस्थानिक बातम्या

लंपी आजारावर खासदार डॉ.कल्याण काळे यांची तात्काळ हस्तक्षेपाची मागणी    जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या संकटावर भावनिक आवाहन

लंपी आजारावर खासदार डॉ.कल्याण काळे यांची तात्काळ हस्तक्षेपाची मागणी    जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या संकटावर भावनिक आवाहन

जालना प्रतिनिधी-राज्यात वाढत असलेल्या लंपी स्किन डिसीज (Lumpy Skin Disease) या संसर्गजन्य आजारामुळे हजारो जनावरे बाधित होत असून अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कल्याण काळे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा.ना. श्रीमती पंकजा मुंडे यांना ईमेलद्वारे सविस्तर पत्र पाठवून तात्काळ वैद्यकीय मदत, लसीकरण मोहिम आणि विशेष आर्थिक सहाय्याची मागणी केली आहे.

डॉ. काळे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, “शेतकरी वर्ग आधीच अतिवृष्टी, उत्पादन खर्च वाढ आणि पिकांचे नुकसान यामुळे संकटात सापडलेला आहे. अशा परिस्थितीत लंपी आजारामुळे त्यांच्या उपजीविकेचा आधार असलेले पशुधनच धोक्यात आले आहे. शासनाने मानवी दृष्टिकोनातून तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.”

तसेच त्यांनी जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना पत्र देऊन खालील तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे —1️⃣ बाधित गावांमध्ये विशेष वैद्यकीय पथके नेमून तपासणी, उपचार आणि लसीकरण मोहिम राबविणे.2️⃣ लंपी आजारग्रस्त जनावरांना मोफत वैद्यकीय सेवा व औषधोपचार उपलब्ध करून देणे.3️⃣ मृत जनावरांच्या मालकांना जनावराच्या वर्गवारीनुसार विशेष आर्थिक मदत देणे.4️⃣ सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांना औषधे, लसी व मनुष्यबळाचा पुरवठा वाढविणे.5️⃣ तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करून परिस्थितीवर सतत देखरेख ठेवणे.डॉ. काळे यांनी नमूद केले आहे की, “लंपी आजारामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन आणि त्यांचा उपजीविकेचा आधार असलेले पशुधन धोक्यात आले आहे. शासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपानेच या परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.”शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता व्यक्त करत त्यांनी पुढे म्हटले की, “शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची हीच वेळ आहे. त्यांच्या पशुधनाचे रक्षण म्हणजे त्यांच्या आयुष्याचे रक्षण. शासनाने तात्काळ निर्णय घेऊन जनावरांना वैद्यकीय मदत आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे अत्यावश्यक आहे.”

या विषयावर त्यांच्या पुढाकाराचे जिल्ह्यातील शेतकरी व जनतेत स्वागत होत असून, अनेकांनी सोशल मीडियावरून डॉ. काळे यांच्या संवेदनशील भूमिकेचे कौतुक केले आहे.

 

With Regards,

संबंधित पोस्ट

जिल्हा रस्ता सुरक्षा समिती बैठक‘ब्लॅक स्पॉट’ निर्मूलनाचा कृती आराखडा तयार करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सव रविवारपासून  -निसर्ग पर्यटनाधारित साहसी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल..🌳 जिल्ह्यातील निसर्गप्रेमींमध्ये उत्साह; उपक्रमांना मोठा प्रतिसाद 

vishwatmaklokswamivarta

पुण्याचा शशांक वाकडे ‘नवी मुंबई महानगरपालिका श्री राज्यस्तरीय’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा मानकरी,सुरेंद्र डंगवाल यांनी पटकाविला ‘नवी मुंबई महापालिका क्षेत्र श्री’ किताब

vishwatmaklokswamivarta

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत;**पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत दिला प्रेरणादायी संदेश*

राष्ट्रीय छात्रसेना प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

SIR अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; 1.91 लाख कायमस्वरूपी स्थलांतरित, 88 हजार 490 मृत मतदारांची नोंद

vishwatmaklokswamivarta