vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

जिल्ह्यातील पशुपालकांना आवाहन

जालना द प्रतिनिधी :- जालना जिल्ह्यात विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ अंतर्गत पशुपालकांसाठी विविध योजना महाराष्ट्र शासनाने विदर्भ व मराठवाड्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सन २०२४-२५ ते २०२७-२८ या कालावधीमध्ये दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामध्ये जालना जिल्ह्याचा समावेश असून ग्रामीण भागातील पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. ५० टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ दुधाळ गाय/म्हशीचे वाटप. ७५ टक्के अनुदानावर उच्च दुधउत्पादन क्षमता असलेल्या १ भृनाचे प्रत्यारोपण केलेली सात महिन्याची गाभण कालवड वाटप. २५ टक्के अनुदानावर प्रजनन पूरक खाद्य पुरवठा. २५ टक्के अनुदानावर फट व एसएनएफ वर्धक खाद्य पुरवठा. ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी यंत्र वाटप. २५ टक्के अनुदानावर मुरघास पुरवठा. १०० टक्के अनुदानावर सावर बहुवार्षिक चारा पिके घेण्यासाठी बियाणे/ठोंबे वाटप. तरी या योजनांचा लाभ घेण्याकरीता जास्तीत जास्त पशुपालकांनी www.vmddp.com या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, जालना यांनी केले आहे. तसेच योजनांसंबंधी अधिक माहितीकरीता विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प टप्पा २ चे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल जाधव जालना यांना ८६०५४५१८५० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. असेही कळविले आहे

संबंधित पोस्ट

बेटी बचाव बेटी पढाओ योजनेच्या 10 वर्ष पुर्तीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे- निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

vishwatmaklokswamivarta

बसस्थानक परिसरात २०० मीटर ‘नो पार्किंग’ नियमाची कठोर अंमलबजावणी; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन

३० एप्रिलपूर्वी ई-आर १ विवरण सादर करण्याचे आवाहन

मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनी घेतले गणेश दर्शन, मनोभावे आरतीही केली

वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा

मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक,आपत्ती निवारणासाठी सज्ज रहा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी