vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज’ व ‘येलो’ अलर्ट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

 

अहिल्यानगर, प्रतिनिधी :- भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात दि. ३० व ३१ मार्च, २०२६ या कालावधीत तुरळक ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह वादळे, सोसाट्याचा वारा व गारपीटीची शक्यता व्यक्त केली असून जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच दि. १ व २ एप्रिल २०२६ या कालावधीत वीजांच्या कडकडाटासह वादळे, मध्यम पाऊस व वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन उपजिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.

मेघगर्जना, वीजा चमकणे किंवा वादळी वारे असताना झाडाखाली उभे राहू नये; सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वादळाच्या वेळी कोणतेही विद्युत उपकरण वापरू नये व विद्युतवाहक वस्तूंपासून दूर राहावे.

मोकळे मैदान, टॉवर्स, विद्युत खांब, ट्रान्सफॉर्मर, धातूचे कुंपण यांजवळ थांबू नये. जाहिरात फलक (होर्डिंग्ज) परिसरात थांबणे टाळावे. वीजा चमकत असताना उघड्यावर असल्यास गुडघ्यावर बसून शरीराचा जमिनीशी संपर्क कमी ठेवावा.

धरण, नदी किंवा कालव्यांच्या पाण्यात उतरू नये; धोकादायक ठिकाणी सेल्फी घेणे टाळावे.शेतकऱ्यांनी पाऊस व गारपीट लक्षात घेऊन शेतीमालाचे संरक्षण व साठवणूक करावी.बाजार समितीत आणलेला माल सुरक्षित ठेवण्याची खबरदारी घ्यावी.जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे. नागरिकांनी वादळी वारे, वीज, पाऊस व गारपीट यापासून स्वतःचे व जनावरांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी नजीकच्या पोलीस स्टेशन किंवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे टोल फ्री क्रमांक १०७७ तसेच ०२४१-२३२३८४४ अथवा २३५६९४० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण अंतिम, प्रारूप आरक्षणात कोणताही बदल नाही- उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे- विभागीय आयुक्त यांच्याकडून सर्व 73 आक्षेप नामंजूर 

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना आवाहन 

vishwatmaklokswamivarta

पुरग्रस्त शेतकऱ्यांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडन महाराष्ट्राला विशेष पॅकेज मिळवून देणार -केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले**धाराशिव बीड जालना येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बालकांच्या तपासणीचा पायलट प्रकल्प, १४४ बालकांची तपासणी

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -भारताला जागतिक सर्जनशीलतेचे केंद्र बनवणारा ऐतिहासिक WAVES 2025 महोत्सव भारताची सांस्कृतिक शक्ती आणि तंत्रज्ञानाची जादू एकाच व्यासपीठावरWAVES 2025 मध्ये सामील व्हा आणि जागतिक क्रिएटिव्ह क्रांतीचे साक्षीदार व्हा…

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मंत्री छगन भुजबळ यांनी केले अभिवादन*