vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आंतराष्ट्रीय योग दिन,आबालवृद्धांचा योग सरावात उत्स्फूर्त सहभाग बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामूहिक योगासन.

आंतराष्ट्रीय योग दिन,आबालवृद्धांचा योग सरावात उत्स्फूर्त सहभाग बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात सामूहिक योगासन.

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज जिल्हा प्रशासनामार्फत योगासनांचा सामूहिक सराव केला. बिबी का मकबरा व विभागीय क्रीडा संकूलात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय विविध संस्थांनीही जिल्ह्यात ठीक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यात आबालवृद्धांनी सहभाग घेऊन योग सराव केला. सगळ्यांनी आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा अंगीकार करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले.

बीबी का मकबरा येथे आयोजीत मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनू पी.एम., अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकूणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधीक्षक डॉ. शिल्पा जमगाडे,हेमंत होकरे, जिल्हा युवा अधिकारी मेघा सनवाल, उपशिक्षणाधिकारी दीपाली थावरे तसेच विविध योग संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.

 ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’, ही यंदाच्या योगदिनाची संकल्पना आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण उपस्थितांना दाखवण्यात आले. त्यानंतर सामूहिक योगासने, प्राणायाम आदींचा सराव करण्यात आला. योग गुरु देवेन लड्डा यांच्या मार्गदर्शनात हा सराव करण्यात आला

भारतीय योग संस्थान, जिल्हा योगासन स्पोर्ट्स असो., द आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली योग संस्था या संस्था या उपक्रमात सहभागी झाल्या. या शिवाय सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, राष्ट्रीय छात्रसेना, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आदी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होते.

०००००

संबंधित पोस्ट

दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्गामुळे वाहतूक व मालवाहतूक वेगवान होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली दिल्ली–मुंबई द्रुतगती मार्ग प्रकल्पाची पाहणी

बोगस औषध खरेदी प्रकरणी दोषींवर कारवाई करणार-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

रायगड जिल्ह्यात ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास वर्षभरात 15 दिवसांची विशेष परवानगी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले श्री संत तुकाराम महाराज व श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन ‘राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे’; मुख्यमंत्री फडणवीस यांचे साकडे

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पर्जन्यमान) दि. ०८.०९.२०२५ (मि.मी.)सकाळी ८.०० वाजेपर्यंत

vishwatmaklokswamivarta

लातूर जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख आणि त्यांच्या अधिपत्याखालील निवृत्तीवेतनधारकांच्या अडीअडचणींचे निवारण करण्यासाठी आज लातूर येथे विशेष कार्यशाळा आणि पेन्शन अदालतीचे आयोजन