vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 128 शेतकरी पात्र; ई.के.वाय.सी. फक्त १४ हजार जणांचे पूर्णआधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026जिल्ह्यातील 1 लाख 5 हजार 128 शेतकरी पात्र; ई.के.वाय.सी. फक्त १४ हजार जणांचे पूर्णआधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- राज्य शासनाच्या “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील एकूण १ लाख ५ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले आहेत. दरम्यान पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत केवळ १४ हजार ७६९ शेतकऱ्यांनीच ईकेवायसी पूर्ण केले आहे. तरी उर्वरीत शेतकऱ्यांनी तात्काळ ईकेवायसी पूर्ण करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

 दरम्यान पात्र शेतकऱ्यांच्या नावांची यादी गावोगावी प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांनी जाऊन आपले नाव असल्याची खात्री करण्यासाठी वि.का. सोसायटी, जिल्हा बॅंक, बॅंक, ग्रामपंचायत कार्यालय इ. ठिकाणी गर्दी केली होती.

 

 या योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १,२७६ गावांमधील १ लाख ९० हजार ७०१ शेतकऱ्यांची नावे अपलोड करण्यात आली आहेत. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ५ हजार १२८ शेतकरी पात्र ठरले आहेत. (पात्र शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते.) आता ह्या टप्प्यानंतर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करताच त्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीचा लाभ जमा होईल. तथापि आतापर्यंत केवळ १४ हजार ७६९ शेतकऱ्यांनीच ईकेवायसी पूर्ण केले आहे. अद्याप ९० हजार ३५९ शेतकऱ्यांचे ईकेवआयसी बाकी आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी दिली आहे.

ईकेवायसी विनामूल्य,दरम्यान सहकार आयुक्त यांनी दिलेल्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांसाठी ईकेवायसी प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य आहे. तरी आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र यांनी शेतकऱ्यांकडून ईकेवायसी करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारु नये,असे निर्देश सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील आपले सेवा केंद्र चालकांनी कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांकडून ईकेवायसीसाठी कोणतेही शुल्क आकारु नये असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहेत.

 एकूण १ लाख ५ हजार १२८ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, CSC केंद्र, आपले सरकार सेवा (ASSK) केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा’ किंवा CSC केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक व बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपले नाव लाभार्थी यादीत असल्याची खात्री करून अंगठ्याचे प्रमाणीकरण, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे. जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांनी शेतकऱ्यांना विलंब न करता आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्याचे आवाहन केले असून, अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था किंवा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगितले आहे

 दरम्यान, राज्यातील “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६” अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा लाभ देण्यात येत असून, आधार संलग्नीकरण आणि प्रमाणीकरण आणि अग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करणे ही लाभ मिळविण्याची महत्त्वाची अट असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातही ही प्रक्रिया अजून सुरु असून लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, असेही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

हरवाडी ग्रामपंचायत च्या वतीने गावकऱ्यांच्या स्वप्नातील पूर बांधण्याचे कामाला सुरुवात व स्वच्छ पाणी देणाऱ्या RO प्लांटच्या कामाला सुरुवात… 👏🏻

इंडिगो आणखी अडचणीत– 5 वर्षांपूर्वीचं कोट्यवधींचं प्रकरण समोर, नोटिस जारी

vishwatmaklokswamivarta

राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी९७०.४२ कोटीच्या खर्चास मान्यताशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

सार्वजनिक उत्सवांमध्ये स्वच्छता, आणि अन्न सुरक्षा यास विशेष लक्ष द्यावे – अन्नऔषध प्रशासन विभागाचे आवाहन

जिल्हा युवा पुरस्कारासाठी 15 जानेवारीपर्यंत अर्ज मागणी..

पीडित कुटुंबांना मिळाला शासकीय सेवेचा आधार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 8 वारसांना नियुक्तीपत्रे प्रदान