vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात मोफत आयुष निदान व उपचार शिबिर संपन्न

स्व. क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयात मोफत आयुष निदान व उपचार शिबिर संपन्न

सातारा प्रतिनिधी: आजच्या युगात शारिरीक व्याधीपेक्षा मानसिक व्याधी ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये जास्त आढळुन येतात. त्या करिता शारिरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि योग यांचा समावेश दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाने केला तर माणसाला निरोगी आयुष्य जगणे सहज सोपे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे यांनी केले.

  उद्घन प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव, अति. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अतुल लिपारे, डॉ. उल्का झेंडे, डॉ. अरुंधती कदम, डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. समिर टकले, डॉ. लाहोटी, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मिथुन पवार, सहाय्यक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संजीवनी शिंदे, श्रीमती कालसेकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. प्रियाताई शिंदे म्हणाल्या, प्राचीन काळापासुन आयुर्वेद आणि होमिओपॅथी या दोन्ही औषधोपचाराला अधिक प्राधान्य दिले जात होते. खरे पाहता आयुर्वेद हा प्रत्येकाच्या अवतीभोवती प्रत्येकांच्या स्वयपांकघरात असुन त्यांचा योग्य उपयोग झाल्यास शरीरस्वास्थासाठी निश्चितच फायदेशीर ठरतो. जनजागृती झाल्याने दिवसेंदिवस आयुर्वेदीक आणि होमिओपॅथी औषधउपचाराकडे सर्वसामान्य माणसांचा कल वाढला असुन एक खात्रीशीर औषधोपचार म्हणुन पाहिले जात आहे या औषधउपचाराच्या जनजागृतीसाठी दर तीन महिन्याने एकदा अशा शिबीराचे आयोजन केले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.

 यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जाधव म्हणाले, जिल्हा रुग्णालयात सातारा येथे गेली 17 वर्षे आयुष विभागअंत्यत चांगल्या प्रकारे काम करतआहे. जिल्हा रुग्णालयातील इतर विभागांमधून आयुष विभागात विविध रुग्ण संदर्भित करण्यात येतात व त्या सर्व रुग्णांवर आयुष विभागामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे निदान व उपचार केले जातात असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

 या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. मिथुन पवार जिल्हा आयुष अधिकारी, डॉ. संजीवनी शिंदे सहा. जिल्हा आयुष अधिकारी यांनी सुत्रसंचालन व आभार मानले.

शिबीराच्या यशस्वीते साठी डॉ. अभिजित भोसले, डॉ. किर्ती कुमार घेवारी, डॉ. आफशा खान, योग तज्ञ पुरब आनंदे, प्रियांका जाधव, प्रिती तपासे, जया कदम, पृथ्वीराज गायकवाड, निलम साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले.

 

0000

संबंधित पोस्ट

सिकलसेल, थॅलेसेमिया, हेमोफिलिया जनजागृती सप्ताह 

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात कर्करोग निदानासाठी फिरती कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन; नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातसात तालुक्यामध्ये आरोग्य सुधारण्यासाठी सामंजस्य करार

ठाणे शहर पोलीस आयुक्त, जिल्हा माहिती कार्यालय, वेसाक इंडिया, के.जे. सोमय्या महाविद्यालय व माजी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

कॅन्सर तपासणी घराजवळ – मोबाईल व्हॅनव्दारे तपासणीची नवी मुंबईत विशेष मोहीम

सुपर स्पेशालिटी रुग्णालयात जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta