vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सतीश घाटगे यांच्या पाठपुराव्याला यश : चित्रवडगावातील शेतरस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

सतीश घाटगे यांच्या पाठपुराव्याला यश : चित्रवडगावातील शेतरस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

घनसावंगी : प्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चित्रवडगाव शिवारातील पांदण रस्त्याचा महत्त्वाचा आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे यांच्या पाठपुराव्यामुळे तालुका प्रशासनाने कार्यवाही करत हा रस्ता मोकळा केला

चित्रवडगाव येथील शेतकरी आणि गावकऱ्यांसाठी पांदण रस्ता हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता. या रस्त्याअभावी शेतकरी व ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत होती. गेल्या ६ महिन्यांपासून तुकाराम सोसे, श्रीमंत बप्पा पोकळे, सरपंच गजानन सोसे, बबनराव उघडे आणि स्थानिक शेतकरी बांधवांनी सतीश घाटगे यांच्या माध्यमातून या रस्त्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला. समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन तथा घनसावंगी विधानसभा निवडणूक प्रमुख सतीश घाटगे पाटील यांनी विशेष लक्ष घालून या प्रश्नाला गती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे प्रशासकीय पातळीवर हा विषय तडीस नेणे शक्य झाले. घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन रस्ता मोकळा करून दिला. त्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे गावकऱ्यांना आणि शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गावकऱ्यांची अडचण समजून घेऊन स्वतः प्रत्यक्ष जागेवर येत रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल घनसावंगीचे तहसीलदार रमेश पागोटे यांचे सर्व शेतकरी व चित्रवडगावमधील ग्रामस्थांनी आभार मानले.

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन हा संघ कमाल…. हा विजय ऐतिहासिक!

नमुंमपा पदभरती परीक्षेच्या चौथ्या दिवशी 13128 उमेदवारांनी दिली परीक्षा* *4 दिवसात एकूण 68149 उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा दिली* 

अण्णासाहेब पाटील महामंडळाचा १६७० कोटींचा व्याज परतावा वितरीत*१.७७ लाख तरुणांना स्वयंरोजगाराची संधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेंतर्गत ई-केवायसी करु न शकलेल्या महिलांना जिल्ह्याच्या महिला व बाल विकास कार्यालयात कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश शासनस्तरावरुन देण्यात आलेले नाहीत. याबाबतचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही,असे महिला व बालविकास विभागातर्फे कळविण्यात आले

इंडियन ड्रग मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचा ६३ वा औषध सोहळा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत संपन्न 

vishwatmaklokswamivarta

सेवा भावनेतून जनतेच्या मनात विश्वास निर्माण करा – सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*अनुकंपा आणि सरळसेवा पदभरतीच्या २१० उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान*

vishwatmaklokswamivarta