vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील मतदार गणना अर्जांचे 99.98 टक्के वितरण पूर्ण;डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात

जिल्ह्यातील मतदार गणना अर्जांचे 99.98 टक्के वितरण पूर्ण;डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात

अमरावती, प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) सुरु असून आज दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९९.९८% गणना अर्जांचे वितरण पूर्ण झाले आहे व डिजिटायझेशनचे कामही अंतिम टप्प्यात आहे

जिल्ह्यातील एकूण २५ लाख ४५ हजार ६७७ मतदारांपैकी २५ लाख ४५ हजार १८३ मतदारांपर्यंत हे अर्ज पोहोचवण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ८ विधानसभा मतदार संघांपैकी धामणगाव रेल्वे, बडनेरा, दर्यापूर, मोर्शी आणि अचलपूरमध्ये अर्ज वितरणाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. अमरावती (९९.९९टक्के), मेळघाट (९९.९९ टक्के) आणि तिवसा (९९.८६ टक्के) या मतदारसंघांमध्येही वितरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

    अर्ज डिजिटायझेशनचे 85.68 टक्के काम पूर्ण,जिल्ह्यात आतापर्यंत २१ लाख ८१ हजार ८९ गणना अर्ज गोळा करण्यात आले असून, गोळा झालेल्या सर्व अर्जांचे डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले आहे हे जिल्ह्यातील हे एकूण प्रमाण ८५.६८ टक्के आहे. धामणगावरेल्वे मतदार संघात डिजिटायझेशन ८६.८९ टक्के, बडनेरा ८२.६९ टक्के, अमरावती ७८.५८ टक्के, तिवसा ८३.३४ टक्के, दर्यापूर(अ.ज.) ९०.१६ टक्के, मेळघाट (अ.जा.) ८८.०१ टक्के, अचलपूर ८७.६७ टक्के,मोर्शी मतदार संघात ९०.६४% डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आली आहे.यानुसार १७ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी देण्यात येणार आहे. मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेला येत्या १७ ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. २४ ऑक्टोबर रोजी मतदार याद्यांची प्रारुप प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यानंतर २३ सप्टेंबर पर्यंत दावे व हरकती दाखल करता येणार आहे. २२ नोव्हेंबर पर्यंत दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

जिवती येथील शेतकऱ्यांच्या वन जमिनींच्या पट्ट्यांसंदर्भात बैठक घेणार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘बहु-संस्थात्मक आपत्ती सज्जता सराव’ संपन्न-चक्रीवादळ आणि आपत्कालीन परिस्थितीचा यशस्वी मुकाबला*

श्वेता सिंघल यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला

vishwatmaklokswamivarta

कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात  आज तातडीची सुनावणी  – नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं,कबुतरखान्यांवरील बंदी कायम; हायकोर्टाचे निरीक्षण, समिती नेमण्याचे आदेश

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू : मदत आणि उपचाराला मिळणार गती आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर करता येणार