जिल्हास्तरीय संस्कृत स्पर्धेत प्रणवी भिसेचा प्रथम क्रमांक
जालना : प्रतिनिधी शहरातील ऐतिहासिक श्रीराम संस्कृत विद्यालय (पाठशाळा),ग्रंथ संग्रहालय श्रीराम वाचनालय व अखिल भारतीय शालिवाहन संस्कृत प्रतिष्ठान, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत दिनानिमित्त आयोजित संस्कृत पाठांतर स्पर्धेत ऑक्सफोर्ड स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी प्रणवी राजेश भिसे हिने प्रथम क्रमांक पटकावला. व्यासपीठावर महापालिकेच्या महिला व बालविकास सभापती संध्याताई देठे, नगरसेविका रीमाताई खरात, परीक्षक सुरेखा गव्हाणे उपस्थित होते. स्पर्धेत प्राविण्य प्राप्त १७ व इयत्ता ९ वी व १० वी च्या ०९ विद्यार्थांचा पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. यावर्षी एकूण ३०४ विद्यार्थांनी स्पर्धेत सहभाग घेतला तर एकूण ६२ विद्यार्थांनी परितोषिके देण्यात आली. सूत्रसंचालन शाम शेलगावकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार जयश्री कुलकर्णी यांनी मानले. याप्रसंगी सुधाकर वाहेगावकर, श्रीकांत शेलगावकर, कल्याणी कुलकर्णी, सुर्यकांत रत्नपारखी,सुमित कुलकर्णी, कीर्ती शेलगावकर, मनोहर कुलकर्णी, संदीप नेरकर, अमोल कुलकर्णी, मीरा बोधे, शैलेन्द्र बदनापुरकर, रेणुका गुलापेल्ली आदी उपस्थित होते