vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सांगली जिल्ह्यातील ताडी दुकानांचा 21 सप्टेंबरला ई-लिलाव

सांगली जिल्ह्यातील ताडी दुकानांचा 21 सप्टेंबरला ई-लिलाव

 सांगली, प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील ताडी दुकानाचा जाहीर ई-लिलाव दिनांक 21 सप्टेंबर 2026 रोजी होणार असून याची सर्व इच्छुक निविदाधारकांनी नोंद घ्यावी, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजित देशमुख यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, ताडी वर्ष 2026-2027 (01 सप्टेंबर, 2026 ते दि. 31 ऑगस्ट, 2027) करिता ताडी दुकाने जाहीर ई लिलाव-नि-निविदा पध्दतीने देण्यात येणार आहेत. ही जाहीर ई लिलाव-नि-निविदा दि. 31 ऑगस्ट ते दि. 15 सप्टेंबर 2026 या कालावधीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या http://www.mahatenders.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशीत करण्यात आली आहे. ताडी दुकानांची यादी, इतर नियम ई लिलाव -नि-निविदा बाबतची अटी व शर्ती इत्यादी बाबतची सविस्तर माहिती http://www.mahatenders.gov.in व www.sangli.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. तसेच अधिक माहिती आवश्यक असल्यास अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सांगली यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन योजना राबविण्यासाठीमुख्याध्यापकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

कोल्हापूर विभागाला १२० नवीन बस मिळणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोल्हापूर जिल्ह्यातील चार सुसज्ज बसस्थानकांचे लोकार्पण

जिल्हा गंथोत्सवाचे थाटात उद्घाटन;सुजाण समाज घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची चळवळ व्हावी- पुरुषोत्तम भापकर

vishwatmaklokswamivarta

भराडखेड्यात भव्य भराडखेडा प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांच्यासह हस्ते नाणेफेक करुन स्पर्धेला सुरुवात

बुधवारी हदगाव येथे पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

वाडा-भिवंडी रस्त्याचे काम गतीने करणार- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले