vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गणेशोत्सवात ‘सेवांचा जागर’; टपाल, विमा, आधार अन् आरोग्यसेवा एकाच छताखाली‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत खामगावात ‘गणपती नाईट कॅम्प’; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशोत्सवात ‘सेवांचा जागर’; टपाल, विमा, आधार अन् आरोग्यसेवा एकाच छताखाली‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत खामगावात ‘गणपती नाईट कॅम्प’; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

बुलढाणा, द प्रतिनिधी : गणरायाच्या दर्शनासाठी एकत्र आलेल्या नागरिकांना शासकीय योजना व विविध सेवांची माहिती आणि प्रत्यक्ष सेवेचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, या उद्देशाने ‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत खामगाव येथील वंदेमातरम गणेशोत्सव मंडळात आयोजित करण्यात आलेल्या ‘गणपती नाईट कॅम्प’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘लोकसंवाद-२०२६’ या विशेष जनजागृती मोहिमेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा डाक विभाग आणि संबंधित विभागांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या लोककल्याणकारी योजना, सेवा व उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येणाऱ्या गणेश मंडळांच्या परिसरात लोकसंवादाच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर करण्यात येत आहे. ‘गणपती नाईट कॅम्प’मध्ये टपाल, विमा, बचत योजना, डिजिटल बँकिंग, आधार तसेच आरोग्यविषयक सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या.टपाल व डिजिटल बँकिंग सेवांची माहिती

कॅम्पमध्ये स्पीड पोस्ट, रजिस्टर्ड पोस्ट, पार्सल बुकिंग, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज बँक (POSB), पोस्टल लाइफ इन्शुरन्स (PLI) आणि रुरल पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच UPIच्या माध्यमातून विमा हप्ता भरणे आणि डिजिटल बँकिंग व्यवहार करण्याची पद्धत प्रत्यक्ष समजावून सांगण्यात आली.

आधार अद्ययावतीकरणासह आरोग्य तपासणी,कॅम्पच्या ठिकाणी आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक आरोग्यविषयक समुपदेशन देण्यात आले. कृषी व महसूल विभागाच्या विविध योजना आणि शासनाच्या लोककल्याणकारी उपक्रमांचीही माहिती नागरिकांना देण्यात आली.‘बाप्पा डॉट ओआरजी’चीही जनजागृती महाराष्ट्राच्या समृद्ध गणेशोत्सव परंपरेचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या उपक्रमाची माहितीही यावेळी देण्यात आली. नागरिकांनी आपल्या घरातील गणेशोत्सवाच्या परंपरा, आठवणी, माहिती आणि छायाचित्रांची नोंद या उपक्रमांतर्गत करावी, असे आवाहन करण्यात आले.

अधिकारी, कर्मचारी व गणेश मंडळाचे पदाधिकारी सहभागी,भारतीय डाक विभागाच्या वतीने अमोल पिंपळकर, विशाल मापारी, संजय खोडे व वैभव निकम यांनी सहभाग घेतला. आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. सुहासिनी खरोडकर, वैद्यकीय अधिकारी, खामगाव; डॉ. देवेंद्र रोकडे, वैद्यकीय अधिकारी, खामगाव; सोपान ठबाले, भाग्यश्री दांडगे, नाजुका गवई व जया इंगळे यांनी नागरिकांना सेवा दिली.,वंदेमातरम गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष दिलीप गुप्ता, सचिव मुन्ना पुरवार तसेच विनोद तिवारी, अतुल खंडेलवाल, दिनेश शर्मा, गोपाल पंडा, मयूर जेटवा, शानू शर्मा, संदीप गुप्ता, अनुज जोशी, संजोग गुप्ता, बाळू पाटील, जीत गुप्ता आदी उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या उत्सवी वातावरणात आयोजित या ‘गणपती नाईट कॅम्प’मुळे नागरिकांना विविध शासकीय सेवा, योजना आणि उपक्रमांची माहिती एकाच ठिकाणी मिळाली. सेवा आणि जनजागृती यांचा संगम साधणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध सेवांचा लाभ घेतला.

0000

संबंधित पोस्ट

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ..

एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

आज आदरणीय दादांना जाऊन पाच महिने पूर्ण झाले… सुनेत्रा ताई अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य

इतिहास घडविणाऱ्या खेळाडूंच्या आठवणी जपण्याचा उपक्रम अभिनव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वानखेडे स्टेडियमवरील स्टँड व गेटच्या नामकरण सोहळ्यात क्रिकेट दिग्गजांचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

राज्य शासनाच्या सेवा नागरिकांना व्हॉट्सॲपवरही उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे येथे गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महाअधिवेशनाचा समारोप

अनुसूचित जाती- जमातीच्या बेरोजगारांसाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन