vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अवैध मुरूम वाहतूक करणारा टिप्पर व रेती उत्खनन करणारे जेसीबी जप्त; जाफ्राबाद तालुक्यात महसूल प्रशासनाची कारवाई

अवैध मुरूम वाहतूक करणारा टिप्पर व रेती उत्खनन करणारे जेसीबी जप्त; जाफ्राबाद तालुक्यात महसूल प्रशासनाची कारवाई

जालना, प्रतिनिधी : जाफ्राबाद तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने कारवाई करत मौजे गोंधनखेडा येथून अवैध मुरूम वाहतूक करणारा एक टिप्पर, तसेच काळेगाव (बोबडेवाडी) येथून अवैध रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी मशीन जप्त करण्यात आले.जाफ्राबाद तालुक्यातील मौजे गोंधनखेडा परिसरात अवैधरीत्या मुरूम वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाच्या पथकाने कारवाई करत संबंधित एक टिप्पर जप्त केला

तसेच काळेगाव (बोबडेवाडी) परिसरात अवैधरीत्या रेती उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पथकाने तेथे कारवाई करून रेती उत्खननासाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी मशीन ताब्यात घेतले.पकडण्यात आलेली दोन्ही वाहने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन, टेम्भूर्णी यांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाकडून अशा प्रकारच्या कारवाया सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२६ च्या माध्यमातून महाराष्ट्र डिजिटल क्रिएटिव्ह अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करेल– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’इंडिया रायझिंग’ आणि ‘जिओ ब्लास्ट’मुळे भारतीय युवा गेमर्ससाठी जागतिक व्यासपीठ खुले..

vishwatmaklokswamivarta

राज्यमंडळाने “त्या” निर्णयात केला मोठा बदलआंदोलनाचा धसका घेत अखेर मागणी मान्य,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन स्थगित..

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १० वी व १२ वी परीक्षांसाठी कलम १६३ लागू; परीक्षा केंद्रांभोवती ५० मीटर परिसरात निर्बंध..

शेगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

संभाव्य पूर परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी अशोक काकडे- संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रात्यक्षिक संपन्न…

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक; कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी

vishwatmaklokswamivarta