vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनगणना-२०२७ च्या तयारीला वेग; घरयादी व घरगणनेच्या कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणसंक्षिप्त घरयादी (AHL) तयार करण्याबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न

जनगणना-२०२७ च्या तयारीला वेग; घरयादी व घरगणनेच्या कामासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणसंक्षिप्त घरयादी (AHL) तयार करण्याबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न

बुलढाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात जनगणना-२०२७ च्या पहिल्या टप्प्यातील ‘घर-सूची आणि गृह जनगणना’ (House-listing and Housing Census) हे काम दि. १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. आता लोकसंख्या गणनेसाठी घरयादी व घरगणना गटांमधून (HLBs) प्रगणक गट (EBs) तयार करणे तसेच संक्षिप्त घरयादी (AHL) तयार करण्याच्या अनुषंगाने चार्ज जनगणना अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहाय्यक यांचे एकत्रित प्रशिक्षण जिल्हास्तरावर घेण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉल येथे दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी निवासी जिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी सुरेश कव्हळे प्रशिक्षणास उपस्थित होते.जनगणना संचालनालय, मुंबई यांच्या कार्यालयाकडून प्रशिक्षण देण्यासाठी नियुक्त सहायक संचालक प्रविण भगत आणि एस.आय. जी.आय. ऋषीकेश पाथरे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना संक्षिप्त घरयादी (AHL) तयार करण्याची कार्यपद्धती याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणादरम्यान जनगणना प्रक्रियेतील विविध बाबी, घरयादीची अचूक नोंद, प्रगणक गटांची निर्मिती तसेच संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी तहसीलदार (सा.प्र.) संजीवनी मुपडे उपस्थित होत्या.

0000

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये CCTV ची बारीक नजर पहिल्या टप्प्यात ५२४ शाळांमध्ये काम पुर्ण; उर्वरित शाळांमध्ये एप्रिल २०२६ अखेरपर्यंत शीघ्रतेने CCTV बसविणार…

लीलावती हॉस्पिटल ने जारी केले हेल्थ बुलेटीन बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर: दोन सर्जरी झाल्या, डाव्या हातावर…

vishwatmaklokswamivarta

बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी पंचसूत्री कार्यक्रमप्रभावीपणे राबवावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

राज्यातील विविध जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाचा इशारा हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी अलर्ट जारी

जलदगतीने मोजणी होण्यासाठी चांगल्या प्रतीचे रोव्हर्स खरेदी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार रोव्हर्स खरेदी आणि महसूलमधील कार्यालयाच्या बांधकामांच्या निधीला प्रशासकीय मान्यता

व्हाईस ऑफ मीडियाला मिळणार दोन नवे जिल्हाध्यक्ष!कृष्णा सपकाळ यांनी सोपवला प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्केंकडे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा…

vishwatmaklokswamivarta