vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे रेल्वे स्थानकावर धडक कारवाई मंगरूळुरू एक्सप्रेसमधून होणारी ७१ हजार ५६० रुपयांची गोवा निर्मित विदेशी दारू जप्त!

ठाणे रेल्वे स्थानकावर धडक कारवाई मंगरूळुरू एक्सप्रेसमधून होणारी ७१ हजार ५६० रुपयांची गोवा निर्मित विदेशी दारू जप्त!

ठाणे, प्रतिनिधी: राज्य उत्पादन शुल्क विभागाने ठाण्यात मोठी कारवाई करत परराज्यातील गोवा निर्मित विदेशी मद्याची रेल्वेतून होणारी तस्करी उधळून लावली आहे. ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर मंगरूळुरू एक्सप्रेसमधून उतरणाऱ्या एका रेल्वे परिचारकाकडून तब्बल ७१,५६० रुपये किमतीचा गोवा निर्मित अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे

डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई), प्रसाद सुर्वे (सहआयुक्त, अंमलबजावणी व दक्षता), प्रदीप पवार (विभागीय उपआयुक्त, कोकण विभाग, ठाणे), आणि प्रवीण तांबे (अधीक्षक, ठाणे-१) यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नमाला गायकवाड (उप-अधीक्षक-२, ठाणे-१) आणि आनंद अं. पवार (प्र. उप-अधीक्षक तथा निरीक्षक, ई विभाग, ठाणे-१) यांच्या पथकाने ही कारवाई पार पाडली.

दि.२३ सप्टेंबर रोजी दारूबंदी गुन्ह्यांच्या अनुषंगाने गस्त घालत असताना, निरीक्षक आनंद अं. पवार आणि त्यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, दुपारी १२:१५ वाजता ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ८ वर मंगरूळुरू एक्सप्रेस (गाडी क्र. १२१३४) मधून एक इसम दोन बॅगांसह उतरताना संशयास्पद हालचाली करताना आढळला. पथकाने तात्काळ त्यास जागेवर थांबवून आपली ओळख पटवली आणि चौकशी केली. सदर इसमाने आपले नाव शिवम छनबस मठपती असून आपण रेल्वेमध्ये परिचारक (अटेंडन्ट) म्हणून काम करत असल्याचे सांगितले. त्याच्याकडील बॅगांची तपासणी केली असता, त्यात गोव्यातील विविध नामांकित ब्रँड्सचा मद्यसाठा आढळून आला.

या कारवाई दरम्यान रॉयल चॅलेंज व्हिस्की, ओल्ड मंक कॉफी रम, रॉयल ग्रीन व्हिस्की, ऑकस्मिथ सनटोरी व्हिस्की, बकार्डी गावा व्हिस्की, ब्लॅक अॅन्ड व्हाईट व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, व्हॅट ६९ व्हिस्की, ऑकस्मिथ गोल्ड व्हिस्की यांसह विविध ब्रँड्सच्या व विविध क्षमतेच्या एकूण ६१ सिलबंद बाटल्या (एकूण ३६.८५ बल्क लिटर) आणि दोन ट्रान्स कंपनीच्या काळ्या-निळ्या रंगाच्या बॅगा असा एकूण ७१,५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

या प्रकरणी आरोपी शिवम छनबस मठपती याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) व १०८ अन्वये गुन्हा नोंद क्र. २५७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीला मा. न्यायालयासमोर उपस्थित केले असता न्यायालयाने त्यास एक दिवसाची एक्साईज कस्टडी सुनावली आहे.या धडक कारवाईत आनंद अं. पवार (निरीक्षक, ई विभाग, ठाणे-१), पी. एम. खरबे (दुय्यम निरीक्षक, ई-३ विभाग), एच. एम. देवकते (सहाय्यक दुय्यम निरीक्षक), एस. एस. पैठणकर (जवान ब.क्र. ३३, ई-१ विभाग) आणि आर. एस. गोलतकर (जवान ब.क्र. २२, ई-३ विभाग) यांनी सक्रिय सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक पी. एम. खरबे करीत आहेत, अशी माहिती निरीक्षक आनंद अं. पवार यांनी कळविली आहे.

000000

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिनानिमित्त बॅंक ऑफ महाराष्ट्र,ठाणे अंचल कार्यालयातर्फे महिला मेळावा संपन्नमेळाव्यामध्ये एकूण 52 बचतगटांना 2 कोटी 65 लाख रुपयांचे कर्जवाटप..

आपला परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचा युवकांनी संकल्प करावा – राज्यपाल सी पी राधाकृष्णन एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत राजभवन येथे सिक्कीम राज्य स्थापना दिवस

गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरेला डिजिटल व्यासपीठ‘Bappa.org’ डिजिटल उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे – जिल्हा परिषद ठाणेचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महात्मा ज्योतीबा फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त लाडु महाप्रसाद वाटप समितीची निवड

देहदान, अवयव दान हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा.एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठात डॉ. सुशील मेश्राम यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मंत्रालय/वर्ल्ड ट्रेड सेंटर मार्गे अटल सेतू MTHL या मार्गावरील मार्ग क्र.116 व 117 या मार्गांवर ‘महिला विशेष’ बससेवा सुरु