सेवा_संकल्प_अभियानतंर्गत पोषण व आरोग्याबाबत जनजागृती
आरोग्य प्रतिनिधी▪︎सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे किशोरवयीन मुलींना आहारविषयक मार्गदर्शन; स्तनदा मातांची गृहभेटसातारा : सेवा संकल्प अभियान आणि पोषण माह यांचे औचित्य साधून सातारा शहरातील मंगळवार पेठ येथे विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांतर्गत किशोरवयीन मुलींना आहार व पोषणाबाबत मार्गदर्शन करून आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली
किशोरवयीन मुलींनी दैनंदिन आहारामध्ये पौष्टिक व संतुलित आहाराचा समावेश करणे, योग्य प्रमाणात पाणी पिणे तसेच आरोग्याची काळजी घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या वाढीच्या वयात पोषणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
तसेच सेवा संकल्प अभियानांतर्गत स्तनदा मातांना गृहभेटी देऊन माता व बालकांच्या आरोग्याची माहिती घेण्यात आली. बालकांच्या योग्य वाढीसाठी मातांचे पोषण, स्तनपान आणि आरोग्यविषयक काळजी याबाबत आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
पालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण, स्वच्छता, आरोग्य आणि योग्य आहाराचे महत्त्व याबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
या विविध उपक्रमांच्या माध्यमातून किशोरवयीन मुली, माता, बालकांचे पालक आणि नागरिकांमध्ये पोषण व आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न #करण्यात आला.