vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एसआरपीएफच्या वतीने नागरिकांसाठी२४ तास शुद्ध व थंड पाणी उपलब्ध एसआरपीएफच्या वतीने नागरिकांसाठी २४ तास शुद्ध व थंड पाण्याची सुविधा

एसआरपीएफच्या वतीने नागरिकांसाठी२४ तास शुद्ध व थंड पाणी उपलब्ध एसआरपीएफच्या वतीने नागरिकांसाठी २४ तास शुद्ध व थंड पाण्याची सुविधा

जालना,(प्रतिनिधी)- राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३, जालना यांच्या आस्थापनेवर पोलीस कल्याण उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी एसआरपीएफ३०० क्वार्टर येथील हनुमान मंदिर गेटसमोर, राज्य राखीव पोलीस बल, गटक्रमांक ३ येथे ‘तृष्णा वॉटर प्लांट एटीएम’च्या माध्यमातून शुद्ध व थंडपिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांना २४ तास या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ३ चे समादेशक संजयकुमार बारकुंड यांच्यासंकल्पनेतून नागरिकांच्या सेवेसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यावॉटर एटीएममधून भारतीय मानक संस्था (बीआयएस)च्या निर्धारित मानकांनुसारशुद्ध केलेले पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. या पाण्यामध्ये ऊDए ५००मिलीग्रॅम, पीएच मूल्य ६.५ ते ८.५, कॅल्शियम ७५ मिलीग्रॅम, मॅग्नेशियम ३०मिलीग्रॅम, क्लोराईड २५० मिलीग्रॅम, सल्फेट २०० मिलीग्रॅम, आयर्न १मिलीग्रॅम आणि फ्लोराइड १ मिलीग्रॅम इतके प्रमाण ठेवण्यात आले आहे.नागरिकांना माफक दरात पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून १ लिटरपाण्यासाठी २ रुपये, ४ लिटरसाठी ५ रुपये, ८ लिटरसाठी ८ रुपये आणि १५

लिटरसाठी १५ रुपये असे दर निश्चित करण्यात आले आहेत. जालना शहरातीलनागरिकांना विशेषतः परिसरातील नागरिकांना या सुविधेचा २४ तास लाभ घेतायेणार आहे. नागरिकांनी या शुद्ध व थंड पाण्याच्या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एसआरपीएफ गट क्रमांक ३, जालना यांच्यावतीने करण्यात आले आहे.

००००००

फोटो ओळी…….राज्य राखीव पोलीस बल, गट क्रमांक ३, जालना यांच्या आस्थापनेवर पोलीसकल्याण उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी एसआरपीएफ ३०० क्वार्टर येथे ‘तृष्णावॉटर प्लांट एटीएम’च्या माध्यमातून शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्धकरून देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

०००

संबंधित पोस्ट

परदेश अभ्यास दौरा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा –जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती वंदना शिंदे

लोणंद येथे सेवा संकल्प अभियाना अंतर्गत नव चेतना बाल मेळावा उत्साहात संपन्न* 

vishwatmaklokswamivarta

बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश**मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक*

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन 

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २८ एप्रिलला होणार मतदान..

80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर