देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री, वार्षिक आधारावर २१ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांनी वाढून ४ लाख ५४ हजार ५७४ युनिट्सवर पोहोचल्याचं ‘सियाम’ या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं
देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री, वार्षिक आधारावर २१ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांनी वाढून ४ लाख ५४ हजार ५७४ युनिट्सवर पोहोचल्याचं ‘सियाम’ या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं
व्यावसायिक प्रतिनिधी-यंदाच्या सप्टेंबर महिन्यात देशात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री, वार्षिक आधारावर २१ पूर्णांक ८ दशांश टक्क्यांनी वाढून ४ लाख ५४ हजार ५७४ युनिट्सवर पोहोचल्याचं ‘सियाम’ या उद्योग संघटनेनं जारी केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ती ३ लाख ७३ हजार ३४७ युनिट्स इतकी होती.
यंदाच्या सप्टेंबर महिन्यात दुचाकी वाहनांची घाऊक विक्री १३ पूर्णांक ५ दशांश टक्क्यांनी वाढून २४ लाख ६३ हजार युनिट्सवर पोहोचली असून, गेल्या वर्षी याच काळात ती २१ लाख ७० हजार युनिट्स इतकी होती. तर तीन चाकी वाहनांची घाऊक विक्री १६ टक्क्यांनी वाढून ९८ आजार १६२ युनिट्सवर पोहोचली. गेल्या वर्षी याच काळात ती ८४ हजार ६३५ युनिट्स होती, असं यात म्हटलं आहे.