vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कायदेविषयक जनजागृती शिबिरास प्रतिसाद..

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कायदेविषयक जनजागृती शिबिरास प्रतिसाद..

 

सांगली, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील कॉमन मिनिमम प्रोग्रामनुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या वतीने रतिलाल गोसलिया सर्वोदय विद्यालयात बालकांचे लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO ACT), हुंडा, जातीय भेदभाव, स्त्री भ्रूण हत्या आणि इतर प्रचलित सामाजिक दुष्कृत्यांशी संबंधित कायदेशीर साक्षरता या विषयक कायदेशिबीर घेण्यात आले.

लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO ACT) याबद्दल मुलामुलींना त्यांना समजेल अशा भाषेमध्ये कायद्याचे वर्णन करून माजी न्यायाधीश अॅड. फारुक कोतवाल म्हणाले, मुलींनी सर्व क्षेत्रात पुढे यायला हवे. वाईट प्रवृत्तीच्या लोकांना न घाबरता समाजामध्ये आपले स्थान निर्माण केले पाहिजे. मुलींसाठी भारतामध्ये अनेक प्रकारचे कायदे निर्माण केले आहेत.

याबद्दल त्यांनी सोप्या भाषेत माहिती दिली. मुलामुलींनी मोबाईलचा वापर टाळावा. आई, वडील व शिक्षकांची स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका सुचेता म्हेतर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते विजय कोगनोळे यांनी तर आभार नितीन आंबेकर यांनी मानले. सूत्रसंचालन श्रीमती नसिमा मुकादम यांनी केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.000

संबंधित पोस्ट

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठीमाजी सैनिकांनी ऑनलाईन नोंदणी करावी..

vishwatmaklokswamivarta

सांगली सह सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ विधान परिषद निवडणूक २०२६; सांगली जिल्ह्यातील ५ तर सातारा जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर होणार मतदान

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन

ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम

मराठवाड्यातील अतिवृष्टीने बाधीत शेतकर्‍यांना मदतीची मागणी करणार्‍या हंबर्डा मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा !: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta