vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यठळक बातम्या

ह्युमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर;-नागरिकांनी घाबरुन न जाता सूचनाचे पालन करावे – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 ह्युमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर;-नागरिकांनी घाबरुन न जाता सूचनाचे पालन करावे – जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 

राज्य प्रतिनिधी-

बुलढाणा, : चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरसचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अर्लट मोडवर असून आरोग्य विभागाने दक्षता घेत पूर्वनियोजन करावे. तसेच आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या दालनात चीनमध्ये उद्रेक होत असलेल्या मानवी मेटान्यूमो व्हायरस संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. पाटील म्हणाले की, सध्या चीनमध्ये ह्युमन मेटान्यूमो व्हायरस (Human Metapneumovirus) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. ह्युमन मेटान्यूमोव्हायरस(HPMV) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने जाहिर केलेल्या मार्गदर्शक सूचनाचे पालन केल्यास घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. एचपीएमव्हीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात औषध साठा, ऑक्सिजन साठा, खाटांची संख्या उपलब्ध आहे. आवश्यकता भासल्यास अधिक खाटांचे नियोजन करण्यात आलेले आहे. तसेच सर्वेक्षणाचे कार्य अधिक गतिमान करुन सर्दी-खोकला अर्थात आयएलआय, सारी रुग्णांचे जलद सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश आरोग्य विभागांने देण्यात आले आहे.

मानवी मेटान्यूमो व्हायरस Human Metapneumovirus (HPMV) सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये 2001 मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमो व्हायरस(एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. ज्यामुळे श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास(सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. या अनुषंगाने डीजीएचएस आणि एनसीडीसी दिल्ली संचालक यांनी मार्गदर्शक सूचना जाहीर केले आहे. यामध्ये खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये ? या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

काय करावे : जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाकावे. साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवावे. ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहावे, भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्नाचे सेवन करावे. संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे वायुविजन (व्हेंटीलेशन) होईल, याची दक्षता घ्यावी.

काय करू नये : हस्तांदोलन, टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर, आजारी लोकांशी जवळचा संपर्क, डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळावे.

लक्षणे:- सर्दी, ताप, खोकला, शिंका येणे, डोकेदुखी, थकवा हि या आजाराची सर्वसामान्य लक्षणे आहेत. संशयित असलेल्या व्यक्तीचे आजाराचे निदान करण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक येथे आरटीपीसीआर, ॲटिजेन नोजल टेस्ट, सीटी स्कॅन व एक्स-रे ह्या तपासण्या उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. वर्ष 2023 च्या तुलनेत डिसेंबर 2024 मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. तरी सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये ? या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

 या आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास किंवा काही संशय असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित जवळच्या आरोग्य संस्थामध्ये डॉक्टरांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व नागरिकांना करण्यात येत आहे.000000

संबंधित पोस्ट

बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी

दीपोत्सव’ महाराष्ट्राच्या गौरवशाली वाटचालीस नवी दिशा देणारा ठरो : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी बळीराजाच्या आयुष्यात पुन्हा चांगले दिवस घेऊन येवो

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूक 2025-2026 करिता मतदान अधिका-यांच्या प्रशिक्षणास नेरुळ विभागापासून प्रारंभ-प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांवर कायदेशीर कारवाई

लेख-;एकात्म मानवतावाद : सुशासनासाठी भारताचा मौलिक दृष्टिकोन

vishwatmaklokswamivarta

संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट,यानंतर मराठी पत्रव्यवहाराला मराठीतून उत्तर

आपत्ती व्यवस्थापनासाठी यांत्रिक बोटी उपयुक्त ठरतील – पालकमंत्री चंद्रकांत पाटील पलूस तालुक्यासाठीच्या ८ यांत्रिक बोटींचे औदुंबर येथे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta