vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज सुरू; २७ तारखेपर्यंत करता येणार अर्ज*

आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज सुरू; २७ तारखेपर्यंत करता येणार अर्ज*

 

ठाणे प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे)*- ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असणाऱ्या जास्तीत जास्त बालकांच्या अर्जाची नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार(आरटीई) कायद्या अंतर्गत वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिले जातात. ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका अंतर्गत एकूण ६२७ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३२० रिक्त जागा उपलब्ध आहेत.

 ‘आरटीई’ अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_Portal या वेबसाईटवर दि. १४ जानेवारीपासून ते २७ जानेवारीपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पालकांसाठी मदत केंद्रांची यादी (Help Centers), ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणी बाबत मार्गदर्शक पुस्तिका (User Manual), आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबत सर्व माहिती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी दिली आहे. ०००

संबंधित पोस्ट

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्ह्यातील बँकांची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

बुलढाण्यात “रन फॉर फॉरेस्ट” मॅरेथॉनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश 600 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग ..

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केली मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्त्यांची पाहणी

माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी जाहीर.! नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मा.संतोष बोराटे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तिपत्र