vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा तात्काळ शासन सेवेत समावेश करा,बाबासाहेब कोलते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…

स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा तात्काळ शासन सेवेत समावेश करा,बाबासाहेब कोलते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…

जालना : प्रतिनिधी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस मुला मुलींना हरियाणा सरकारच्या धर्तीवर निवृत्तीवेतन मंजूर करून नामनिर्देशित पाल्यांना शासन सेवेत १९९१ च्या शासन निर्णयाप्रमाणे समावेश करून घेण्याची मागणी स्वातंत्र्य सैनिक पाल्य समितीचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील कोलते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात बाबासाहेब कोलते यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक व वारस पत्नी मयत झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना तसेच त्यांच्या मुलामुलींना हरियाणा सरकारच्या धर्तीवर निवृत्तीवेतन मंजूर करावे कारण भारत देशातील हरियाणा सरकारने राज्यातील मयत झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारस मुलामुलींना दि. १५ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करून निवृत्तीवेतन सुरु केले आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलामुलींना निवृत्तीवेतन मंजूर करावे. केंद्र व राज्यशासनाने स्वातंत्र्य सैनिक मयत झाल्यानंतर त्यांना मिळणारे निवृत्तीवेतन शासनाकडून नियमानुसार बंद होते परंतु मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्याची नव्या पिढीला आठवण राहावी व थोर स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास हा त्यांच्या वारस मुला मुलींना कळावात्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबातील एका वारसांना निवृत्तीवेतन वारसाने मंजूर करावे. तसेच महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य गेल्या अनेक दिवसापासून शासनाने नोकर भरतीचा शासन निर्णयच रद्द केल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून वंचित आहे. त्यामुळे स्वातंत्र्य सैनिकांच्या नामनिर्देशित पाल्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे नोकरी पासून वंचित असलेल्या नामनिर्देशित पाल्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शासन सेवेत समावून घेण्यासाठी तात्काळ शासन निर्णय निर्गमित करून नामनिर्देशित पाल्यांना १९९१ च्या शासन निर्णयाप्रमाणे शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी बाबासाहेब कोलते यांनी केली आहे.

संबंधित पोस्ट

जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी हिरवा झेंडा दाखवून केला यात्रेचा शुभारंभ

सहकार पुरस्कार 2023-24 करिता सहकारी संस्थांनी 18 जुलैपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

इमाव विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया; वेळापत्रकास मुदत वाढ..

वारणा धरणात 27.72 टी.एम.सी. पाणीसाठा- कोयना धरणातून 11400 क्युसेक्स तर वारणा धरणातून 4060 क्युसेक्स विसर्ग सुरू

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते इंगोले नगरमधील नागरिकांना जागेची सनद बहाल स्वमालकीची जागा असल्याची सनद मिळाल्याने पट्टेधारकांच्या डोळ्यात आनंदाश्रू; ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत विशेष मोहीम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्तीसगड सीमेवरील दुर्गम कवंडे गावात- 12 कुख्यात नक्षल्यांची शस्त्रांसह शरणागती- आत्मसमर्पण केलेल्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यालाही उपस्थिती- सी-60 जवानांचा सत्कार, अत्याधुनिक एके-103 आणि पिस्तुले दिली- बुलेटप्रुफ वाहनांसह 19 वाहने पोलिसांच्या सेवेत- कोरमा नाल्यावरील आंतरराज्यीय पुलाची ड्रोनने पाहणी…