vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता..

जलसंपदा विभाग-टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता..

 

 पुणे प्रतिनिधी-पुणे जिल्ह्यातील टेमघर प्रकल्पाचे (ता. मुळशी) मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामांकरिता ३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

टेमघर धरणातून पुणे शहराला दरवर्षी ३.४०९ अघफू पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याद्वारे १ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. हा प्रकल्प पुणे शहराच्या वरच्या बाजूस आहे. या प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. यामुळे धरणाच्या तसेच पुणे शहराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसा अहवाल विविध समित्यांनी दिला आहे. त्यांच्या शिफारशींचा विचार करता धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. हे काम केल्याने गळती थांबणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता आज झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने टेमघर प्रकल्पाच्या गळती रोखण्यासाठीच्या उपाययोजना व धरण मजबुतीकरण कामासाठी ३१५ कोटी ५ लाख रुपयांच्या किंमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली.—–०—–

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र महिलांच्या सन्मानार्थ काम करेल सर्वांनी मिळून संकल्प करुया-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर

गोवंश संरक्षणासाठी मार्गदर्शक सूचना जाहिर; अवैध वाहतूक, कत्तल व अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाईचे निर्देश

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त’ गटात नवी मुंबई महानगरपालिकेला राज्यात बहुमान!

राज्यपालांच्या हस्ते १०६ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान…

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना-सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष मोहीम