vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या अंतिम सुधारित उत्तरसूचीबाबतआक्षेप असल्यास दि.10 फेब्रुवारी पर्यंत नोंदवावा..

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेच्या अंतिम सुधारित उत्तरसूचीबाबतआक्षेप असल्यास दि.10 फेब्रुवारी पर्यंत नोंदवावा..

ठाणे, प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2024 पेपर (इ. 1 ली ते 5 वी) पेपर ।। (इ. 6 वी ते 8 वी) चा अंतरिम निकाल परिषदेच्या http://mahatet.in या संकेतस्थळावर दि.31 जानेवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता व या अंतरिम निकालावर दि.06 फेब्रुवारी 2025 पर्यंत गुणपडताळणी व आक्षेप मागविलेले होते.

त्यानुसार दि. 10 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम उत्तरसूचीवर प्राप्त हरकतीनुसार पेपर ।। मधील गणित विज्ञान विषयातील प्रश्नक्रमांक संच A-130, B-125, C-150 व D -145 बाबत आक्षेप प्राप्त झाल्याने तज्ज्ञांच्या अभिप्रायानुसार हा प्रश्न रद्द करण्यात येऊन अंतिम सुधारित उत्तरसूची जाहीर करण्यात येत आहे. याबाबतही कोणाचा आक्षेप असेल तर दि.10 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत mahatet24msce@gmail.com या ई-मेल वर आक्षेप नोंदविता येतील. वरील कालावधीनंतर प्राप्त आक्षेपाचा विचार केला जाणार नाही व तद्नंतर अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त अनुराधा ओक यांनी कळविले आहे.000000

संबंधित पोस्ट

प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव भारत टिकाऊ प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेता बनू शकतो: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासाठी ४.३३ कोटींचा निधी

दिव्यांगांनी पोर्टलच्या माध्यमातून विविध योजना व सेवांचा लाभ घ्यावा – देविदास कोकाटे दिव्यांग उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन

जिल्हा कारागृह अलिबाग येथे बंद्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

कवठेपिरानचा तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्प पर्यावरणपूरक उपक्रम विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta