vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जिल्हा कारागृह अलिबाग येथे बंद्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

जिल्हा कारागृह अलिबाग येथे बंद्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

              रायगड- प्रतिनिधी: कारागृह विभागाच्या सुधारणा व पुनर्वसन” या ब्रिद वाक्याचा उद्देश साध्य होण्याच्या दृष्टीने, अलिबाग जिल्हा कारागृह प्रशासनामार्फत बंद्यांसाठी वेळोवेळी विविध सण उत्सव, सांस्कृतिक, सामाजिक, प्रबोधनात्मक व मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यानुसार जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन “उज्वल भविष्य सामाजिक संस्था, अलिबाग” या सेवाभावी संस्थेमार्फत (दि.21 जून 2026) रोजी अलिबाग जिल्हा कारागृहातील बंद्यांसाठी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.

 

              योग हा व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार आहे. ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. कारागृहाच्या आत चार भिंतीमध्ये बंदीजनांमध्ये स्वस्थ, निरोगी, शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी योग अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनःशांती टिकवून ठेवण्याचा सोपा मार्ग म्हणजे योग.

 

              या योगदिनानिमित्त श्रीमती.उज्वला चंदनशिव, अध्यक्षा, उज्वल भविष्य सामाजिक संस्था, अलिबाग यांच्यामार्फत व श्रीमती ममता म्हात्रे व श्रीमती उत्कर्षा गुरव या योगशिक्षकांमार्फत विविध योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मानसिक आणि शारिरिक संतुलन कसे राखले जाते. तसेच योगाभ्यासातुन बौध्दिक पातळी कशी सुधारते तसेच आपण आपल्या भावना स्थिर व एकाग्र कशा ठेवु शकतो याबाबत महत्व विषद केले. या जागतिक योग दिन कार्यक्रमात अलिबाग जिल्हा कारागृहातील 11 महिला बंदी व 36 पुरुष बंद्यांनी सहभाग नोंदवत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अधीक्षक विशाल बाळासाहेब बांदल यांनी बंद्यांना नियमित योगा करण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले तसेच नियमित योगा करण्याचे आवाहन केले.

 

              हा उपक्रम अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे डॉ.सुहास वारके यांच्या संकल्पनेतून व विशेष कारागृह महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे योगेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला आहे.

 

              या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी देवलु मुकुंद रांजड, सुभेदार, श्रीम.रामेश्वरी मल्लिकार्जुन ढाळगे (महिला शिपाई), महाबिर रामकिसन जगताप, नरसु जयंद्रथ कोळी, बाबासाहेव बाळासाहेब वाणी, अजय एकनाथ जावळे, (कारागृह शिपाई) यांनी कामकाम पाहिले आहे

संबंधित पोस्ट

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना मंत्रालयात अभिवादन

जिल्हा नियोजनचा निधी 25 मार्चपूर्वी खर्च करावा-जिल्हाधिकारी आशिष येरेकर

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी· प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन· व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी..

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकाला भेट देत 6 हजारहून अधिक नागरिकांनी केले वैचारिक अभिवादन.चैत्यभूमी येथेही ज्ञानस्मारकाची माहिती देणारा स्टॉलचैत्यभूमीवरील अभिवादन कार्यक्रमाची ज्ञानस्मारकात थेट प्रक्षेपण व्यवस्था…

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासआवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून द्या – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ..

vishwatmaklokswamivarta