vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

आदिवासी लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी कर्ज योजना२० फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

पुणे, प्रतिनिधी: शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत आदिवासी लाभार्थ्यांसाठी स्वयंरोजगाराच्या कर्ज योजना राबविण्यात येत असून जुन्नर कार्यक्षेत्रात येणाऱ्या पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड व लातूर जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी २० फेब्रुवारी २०२५ पर्यंत अर्ज करावा, असे आवाहन जुन्नर शबरी शाखा कार्यालयाचे शाखा व्यवस्थापक रा.भ. पाटील यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत महिला सबलीकरण योजना, स्वयंसहायता बचतगट, कृषी आणि संलग्न व्यवसाय, हॉटेल ढाबा व्यवसाय, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्ट, लहान उद्योग व्यवसाय, वाहन व्यवसाय, ऑटोरिक्षा, मालवाहू रिक्षा, लघु उद्योंगासाठी स्वतंत्रपणे निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत महिला सबलीकरण योजना-४२, स्वयंसहायता बचतगट-१०, कृषी आणि संलग्न व्यवसाय-३९, हॉटेल ढाबा व्यवसाय-८, ऑटो वर्क शॉप, स्पेअर पार्ट-८, लहान उद्योग व्यवसाय-१७, वाहन व्यवसाय-३, ऑटोरिक्षा, मालवाहू रिक्षा-४, लघु उद्योंगासाठी ६ अशा एकूण १३७ लाभार्थ्यांना योजनेंतर्गत कर्ज योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.

आदिवासी समाजातील इच्छूकांनी www.mahashabari.in या संकेतस्थळावर अर्ज करावा. कोणत्याही कारणास्तव ऑफलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे श्री. पाटील यांनी कळविले आहे.

0000

संबंधित पोस्ट

उद्योजकता विकास केंद्राव्दारे शेळी, कुक्कुट पालन प्रशिक्षण; नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक आणि वन विभागाच्या माजी महिला कर्मचाऱ्यांसाठी भरती

महाराष्ट्रात खाजगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक दोन्ही सभागृहात संमत…

अमृत पेठ-2026 उद्योजक मेळाव्याला 6 मार्चपासून सुरवात..

बांधकाम कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्रबाबत सोप्या पद्धतीची अंमलबजावणी करा-कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांचे निर्देश