vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

प्रोजेक्ट सक्षम उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजु महिलांना उद्योगपूरक उपक्रमांचे वाटप

प्रोजेक्ट सक्षम उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजु महिलांना उद्योगपूरक उपक्रमांचे वाटप

 

मुंबई, प्रतिनिधी : युनायटेड वे मुंबई या सामाजिक संस्थेच्या “प्रोजेक्ट सक्षम” या मुख्य उपक्रमाअंतर्गत महिलांना व्यावसायिक कौशल्ये व उद्योजकीय संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते गरजु महिलांना उद्योगपूरक संसाधनांचे वाटप करण्यात येणार आहे.

बँक ऑफ बडोदाच्या औद्योगिक सामाजिक बांधिलकी अंतर्गत युनायटेड वे मुंबई सोबत करार करण्यात आला आहे. या अंतर्गत १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता वालचंद हिराचंद हॉल, चर्चगेट येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती बॉबकार्डचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र राय यांनी दिली आहे.

सामाजिक समस्यांवर काम करताना आर्थिक दुर्बल घटकांना सशक्त करण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात येतात. प्रोजेक्ट सक्षम हा उपक्रम महिलांना व्यावहारिक कौशल्ये, व्यवसाय प्रशिक्षण आणि आवश्यक संसाधने उपलब्ध करून त्यांचे जीवनमान उंचावण्यावर लक्ष केंद्रीत करतो. शिक्षण, आरोग्य, उत्पन्ननिर्मिती, पर्यावरणीय शाश्वतता आणि सार्वजनिक सुरक्षा यांसारख्या क्षेत्रांत हे कार्यरत आहेत.००

संबंधित पोस्ट

अवैध सावकारीविरोधी कायदा आणखी कडक करणार- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

चांदिवली परीसरात अंमली पदार्थविरोधी मोहीम : मोठ्या प्रमाणात कारवाई करणार- गृहराज्यमंत्री योगेश कदम

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हिमांशू रॉय लिगसी अवॉर्ड्स’वितरण कार्यक्रम

आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीतून बाहेर निघण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज– संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ  • जिल्हा यंत्रणेचा आढावा

शेतकरी हितासाठी ऊसदरासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

🌧️ रायगड जिल्ह्यासाठी IMD नाऊकास्ट इशारा (सायं. ७:०० ते रात्री १०:००)