vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

हातमाग कापड स्पर्धेसाठी प्रवेशिका मागविल्या

हातमाग कापड स्पर्धेसाठी प्रवेशिका मागविल्या

 

छत्रपती संभाजीनगर,द प्रतिनिधी)- शासनाच्या वस्त्रोद्योग विभागामार्फत हातमाग कापड उत्कृष्ट नमुन्याची विभागीय हातमाग कापड स्पर्धा २०२४-२५- गुरुवार दि.२० रोजी आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मंगळवार दि.१८ पर्यंत विणकरांनी आपले कापडाचे वाण पाठवावे,असे आवाहन प्रादेशीक उपायुक्त प्रशांत सदाफुले यांनी केले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील हातमाग विणकर सहकारी संस्था, महामंडळे, खाजगी व इतर क्षेत्रातील हातमाग विणकरांनी हातमागावर तयार केलेल्या कापडाचे वाण नमुने प्रादेशिक उपायुक्त व्सत्रोद्योग, छत्रपती संभाजीनगर, बाळासाहेब पवार सहकार भवन, तिसरा मजला, जाफरगेट, छत्रपती संभाजीनगर येथे मंगळवार दि.१८ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जमा करावेत. विभागातील अधिकाधिक हातमाग विणकरांनी यास्पर्धेत सहभागी व्हावे,असे आवाहन प्रादेशीक उपायुक्त वस्त्रोद्योग प्रशांत सदाफुले यांनी केले आहे.

 

०००००

संबंधित पोस्ट

आयटीआय गटनिदेशकांना मिळणार पदोन्नतीआमदार सुधाकर अडबाले यांचे निर्देश : सहसंचालक यांचे बैठकीत आश्‍वासन..

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदभरतीसाठी1 ते 8 जुलै कालावधीत ऑनलाईन परीक्षा..

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

अमृत’ संस्थेची प्रशिक्षण, अर्थसहाय्य योजना; जिल्ह्यातील युवकयुवतींनी योजनांचा लाभ घ्यावा– विशेष कार्य अधिकारी सिद्धेश्वर वरणगावकर यांचे आवाहन, स्पर्धा परीक्षार्थींना मिळते अर्थसहाय्य..

पंतप्रधानांनी सेमिकॉन इंडिया 2025 दरम्यान प्रमुख सीईओंशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

शासकीय अध्यापक महाविद्यालयात कंत्राटी पदभरती