vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जीवनात अपयशाने कधीही खचून न जाता नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जीवनात अपयशाने कधीही खचून न जाता नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

जालना, (प्रतिनिधी) -जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनत करणेअत्यंत गरजेचे आहे. मेहनत केल्यास यश हे हमखास मिळते. तुमच्या तारुण्याच्या या काळात चांगल्या मित्रांची संगत ही सुद्धा खूप महत्वाचीआहे, असे संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले.जालना शहरात संभाजीनगर प्रभागात असलेल्या शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना संस्थेचे अध्यक्ष तथा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर

बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जीवनात यशस्वी होऊन केवळ पैसामिळवणे हाच हेतू न ठेवता समाजाची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. यातूनचचांगला व्यक्ती म्हणून तुमचे नाव लौकिक होईल व त्यातून तुमचे आई-वडिल,शाळा व गुरुजन यांचे नाव मोठे होईल. अनेक यशस्वी झालेले विद्यार्थी भेटतात तेव्हा त्यांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. या स्पर्धेच्या युगात कधी कधी जीवनात अपयश वाटयाला येते तेंव्हा खचून निराश होऊ नका तर त्यातून

नवीन संधी शोधण्याचा प्रयत्न करा. असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांनाभावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यासपीठावर शहरप्रमुख बाला परदेशी, घनश्याम खाकीवाले, दीपकरणनवरे, माजी नगरसेवक विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. निरोपसमारंभाचे या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करूनआपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंबादास घायाळयांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रेमला पंडित, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गाढवे, शिक्षकअंबादास घायाळ, संदीप वाखरकर, सीमा इंगळे, कांचन वाघ, शिवहरी मांटे,कीर्ती खैरे, अरुणा मांटे, सुमित्रा शर्मा, वसंत गाडेकर, तुकाराम चव्हाणआदींनी प्रयत्न केले.

०००००००

संबंधित पोस्ट

श्री संत सावता माळी पुण्यतिथी समितीच्या अध्यक्षपदी अश्विन अंबेकरउपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर धानुरे, वैजिनाथ नागरे, रामभाऊ पाऊलबुध्दे , कार्याध्यक्षपदी निवृत्ती गायके

पाणीटंचाई निवारणासाठी मोताळा तालुक्यातील 15 गावांमध्ये 20 विंधण विहिरींना मंजुरी

एकल महिला धोरण कार्यशाळेस उस्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र टँकरमुक्त करण्याचे अण्णासाहेब डांगे यांना श्रेय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- डॉ. अण्णासाहेब डांगे यांचा नागरी सत्कार,- शिक्षण, समाजसेवेच्या प्रदीर्घ वाटचालीला मानाचा मुजरा- ‘आम्रवृक्ष’ आत्मचरित्राचे प्रकाशन शैक्षणिक संकुलातील विविध इमारतींचे लोकार्पण

कोरेगाव येथे 6 मे रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

मलकापूर नगरपरिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे अतिकुर रहमान शाफिकूर रहमान विजयी,काँग्रेसचे १४, भाजपचे ६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ नगरसेवक

vishwatmaklokswamivarta