vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ यात्रोत्सवानिमित्त वाहतुक मार्गात बदल..

महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ यात्रोत्सवानिमित्त वाहतुक मार्गात बदल..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिर येथे मोठी यात्रा दि.२५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयोजीत होते. या कालावधीत येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता धुळे सोलापुर महामार्ग व खुलताबाद ते फुलंब्री मार्गावरील जड वाहतुक मार्गात बदल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.

वाहतुक मार्गातील बदल याप्रमाणे-

१. छत्रपती संभाजीनगरकडून कन्नड, वेरुळ , खुलताबाद, दौलताबादकडे जाणारी जड वाहतुक छत्रपती संभाजीनगर –शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी- कसाबखेडा फाटा-वेरुळ बायपास मार्गे- कन्नडकडे जाईल.

२. कन्नडकडून –वेरुळ, खुल्ताबाद, दौलताबाद व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी जड वाहतुक कन्नड-वेरुळ बायपास- कसाबखेडा फाटा- वरझडी- माळीवाडा, शरनापूर फाटा मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील.

३. फुलंब्रीकडून- सुलतानपूर, खुलताबाद, वेरुळकडे जाणारी जड वाहतुक फुलंब्री- छत्रपती संभाजीनगर- शरणापूर फाटा- माळीवाडा-वरझडी – कसाबखेडा फाटा- वेरुळ बायपास मार्गे कन्नडकडे जातील.

हे आदेश दि.२५ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत लागू राहतील. या कालावधीत खुलताबाद ते वेरुळ या परिसरात जड वाहतुक बंद ठेवण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस भरतीला प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपोलीस दलाला बळकटी देणाऱ्या देखण्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन..

डॉ. जयंत नारळीकर गणित आणि विज्ञान अध्ययन समृद्धी कार्यक्रम राज्यातील प्रत्येक शासकीय शाळेत पोहचणार जागतिक दर्जाचे शिक्षण

vishwatmaklokswamivarta

उद्योजक मेळाव्यासाठी नोंदणी करा – जिल्हाधिकारी अशोक काकडे

एसटीच्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता २५ जानेवारी मध्यरात्रीपासून भाडेवाढ लागू

vishwatmaklokswamivarta

विश्वविख्यात वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायक यांचे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीमध्ये १८ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत प्रदर्शन

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात विविध प्रकल्प, विकासकामांना गती देण्यासाठी,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक,मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांची विशेष उपस्थिती