vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारास विभाग प्रमुखांनी स्वत: उपस्थित रहावेजिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

सातारा प्रतिनिधी: पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबाराला विभाग प्रमुखांनीच उपस्थित रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारा संदर्भात जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. या दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

जनता दरबारात येणाऱ्या तक्रारी, निवेदने यांची नोंद करुन संकलन करावे, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहून आपले प्रश्न मांडणार आहेत. मांडण्यात येणारा प्रत्येक प्रश्न विभाग प्रमुखांनी एकून घ्यावा व त्यावर कार्यवाही करावी.

लोकशाही दिनाच्या धर्तीवर जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. विभाग प्रमुखांनी आपल्या सोबत एक संगणक व प्रिंटरची व्यवस्था करावी. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जनता दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक तक्रारी व निवेदनावर कायद्यानुसार व नियमानुसार योग्य तो निर्णय तात्काळ घेऊन तो संबंधिताला कळवावा, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी बैठकीत केल्या.

0000

संबंधित पोस्ट

रेल्वेच्या अधिकृत कॅन्टीनमधून प्रवाशांच्या आरोग्याशी सुरु असलेला खेळ थांबवा,कंत्राटदारावर तात्काळ कडक कारवाई करा खासदार नरेश म्हस्के यांचे मध्य रेल्वेच्या रेल्वे प्रबंधकांना निवेदन..

सातारा जिल्हयातील अनुकंपा उमेदवारांना पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते 4 ऑक्टोबर रोजी नियुक्ती आदेश वितरण*

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन

पुढील ३ तासात मुंबई मुंबई उपनगर पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ५०-६० किमी वेग जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. – मंत्रालय

शिवसेना आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमाला महिलांचा प्रतिसाद..

सागरीमार्ग केवळ श्रीमंतांपुरता नको, सर्वसामान्यांसाठी ‘प्रवासी जलवाहतूक’सुरू करा! – हिंदु विधीज्ञ परिषदेचे शासनाला आवाहन