vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा , मुख्यमंत्र्यांकडे पोचले पीए

राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा , मुख्यमंत्र्यांकडे पोचले पीए

 

राज्य प्रतिनिधी: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं टीका होत असताना अखेर आमदार धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. याबाबत माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना दिली.माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पुढील कार्यवाहीसाठी राजीनामा राज्यपालांकडे पाठविला आहे.

वाल्मिक कराड याचं संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्य आरोपी म्हणून नाव आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यमंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात दाखल केलेल्या सीआयडीच्या आरोपपत्रात कराडला क्रमांक एकचे आरोपी म्हणून घोषित करण्यात आलं. या प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी रात्री फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना आज मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं, अशी माहिती सूत्रानं दिली.

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री मुंडे हे बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांना पालकमंत्री पद देण्यात आलेलं नव्हतं. सध्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे पुण्यासह बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

९ डिसेंबरला झाली होती हत्या-मस्साजोग गावचे सरपंच देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी खंडणीसाठी हत्या करण्यात आली होती. राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं (सीआयडी) २७ फेब्रुवारी रोजी देशमुख यांच्या हत्येसह संबंधित दोन प्रकरणांमध्ये बीड जिल्ह्यातील न्यायालयात १,२०० पेक्षा जास्त पानांचे आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सात जणांना अटक करून मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामधील आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे.

संबंधित पोस्ट

मुंबई ठाणे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा-भारतीय हवामान विभाग

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान सारा तेंडुलकर सन्मानित

vishwatmaklokswamivarta

साप्ताहिक चित्रलेखाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा,चित्रलेखाचे सामाजिक आणि साहित्यिक योगदान महत्त्वपूर्ण-केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वाचकांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रलेखा मासिक-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील २३ नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी आज मतदान

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान….राज्य श्रेणीत महाराष्ट्र तर शहरी स्थानिक स्वराज्य संस्था श्रेणीत नवी मुंबई महानगर पालिका सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित.

vishwatmaklokswamivarta