vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात भाडेतत्वावर भोजनकक्ष, उपहारगृहासाठी 25 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात भाडेतत्वावर भोजनकक्ष, उपहारगृहासाठी 25 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

 

बुलडाणा, प्रतिनिधी: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिखली रोड येथे कार्यरत असून त्यामध्ये माजी सैनिकांच्या उपचाराकरिता इसीएचएस कार्यान्वित आहे. इसीएचएसमध्ये दररोज 100 ते 150 माजी सैनिक विधवा तसेच त्यांचे अवलंबित उपचार व योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात. या सैनिकी मुलांच्या वसगिृहाजवळ 1 कि.मी. अंतराच्या आत अल्पोहाराकरीता कोणतेही उपहागृह उपलब्ध नसल्याने वसतिगृहातील भोजनकक्ष भाडेतत्वावर देण्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिक, माजी सैनिक महिला बचत गट, माजी सैनिक विधवा व इतर नागरीक यांचेकडून अर्ज मागविण्यात येत आहे. भोजनकक्ष भाडेत्वावर देण्यासाठी माजी सैनिक महिला बचत गट, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, इतर नागरीक याप्रमाणे प्राधान्य दिल्या जाईल. तरी इच्छूक अर्जदारांनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बुलडाणा येथे दि. 25 मार्च 2025 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

वारणा धरणात 20.85 टी.एम.सी. पाणीसाठा

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

जात प्रमाणपत्र पडताळणीतील त्रुटींची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

वेध विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाचे जिल्हाधिका-यांकडून पूर्वतयारीचा आढावा.

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे…