vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा ने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दिली नोटीस, शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल…

 

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात स्टँड-अप विनोदी कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तसेच शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआय नोंदविण्यात आला आहे याकरता पोलिसांच्या चौकशीला हजर राहण्याचे नोटीस दिली असल्याची सूत्रांकडून सांगण्यात येत आहे

 

मिळालेल्या माहितीनुसार , मुंबई पोलिसांनी या तक्रारीची  मंगळवारी (25 मार्च) पुष्टी केली आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआय नोंदविण्यात आला असून, कामरा यास बजावलेल्या नोटीसमध्ये चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सांगितले आहे. दरम्यान, कामरा यांनी पोलिसांना औपचारिक विनंती सादर करून चौकशीसाठी हजर राहण्यासाठी एक आठवड्याची वेळ मागितली आहे.

शिवसेनाप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता ‘गद्दार’ असा उल्लेख… एकनाथ शिंदे  यांच्या राजकीय प्रवासाची खिल्ली उडवणाऱ्या एका व्यंगात्मक कृत्यानंतर 36 वर्षीय विनोदी कलाकार महाराष्ट्रात राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आहेत. अलिकडेच झालेल्या एका स्टँड-अप परफॉर्मन्स दरम्यान, कामराने ‘दिल तो पागल है’ मधील एका गाण्याचे विडंबन केले, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कथीतरित्या ‘गद्दर’ असे म्हटले गेले होते. कामरा याने त्याच्या विडंबन गीतात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) मधील अलिकडच्या फुटीलाही स्पर्श केला

त्याच्या प्रतिक्रिया म्हणून शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये कार्यकर्त्यांनी   तोडफोड केली दरम्यान, पोलिसांनी विनोदी स्थळ आणि हॉटेलची तोडफोड केल्याबद्दल 40 शिवसेना कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल केला आहे. सदर शिवसेना नेत्यांना अटक, जामीन मंजूर झाला आहे

स्टँड अप कॉमेडियन कामरा विरुद्ध एफआयआर शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर खार पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याच्या आरोपाखाली कामरा याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला.

संबंधित पोस्ट

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेच्यालाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया करच’- श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती*भारतीय अर्थव्यवस्थेला खिळखिळी करणारी ‘हलाल अर्थव्यवस्था’ मोडून काढणे आवश्यक !

१०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयातून चांगली आरोग्य सेवा मिळणार : रोहयो मंत्री भरत गोगावलेमहाड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भुमीपुजन…

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024’ साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 19 जुलै पर्यंत मुदतवाढ

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी मत नोंदवावे..

राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर