vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वाहतूक बंदी अधिसूचना-उद्या दि 12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी…

वाहतूक बंदी अधिसूचना-उद्या दि 12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी…

 

रायगड प्रतिनिधी- रायगड किल्ला येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५वी पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम दि. 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहॆ. या कार्यक्रमाकरीता नागरिक हे आपआपली वाहने घेवून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या काळात अपघात व वाहतुक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांमुळे जागोजागी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून दि.१२एप्रिल २०२५ रोजी सकाळी ००.०१ ते दुपारी १५.०० वाजेपर्यत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडी पर्यत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी करण्याची अधिसूचनेव्दारे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पारित केले आहेत.

सदरची वाहतूक बंदी अधिसूचना ही दुध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस, औषधे, ऑक्सीजन, भाजीपाला इत्यादी जिवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने, पोलीस वाहने, फायर ब्रिगेड वाहने रुग्णवाहीका, तसेच महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमासाठी येणारी वाहने यांना लागू राहणार नाही असेही जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहॆ.

संबंधित पोस्ट

उल्लास’ साक्षरता अभियानाची परीक्षा आता 29 मार्चला;नोंदणी पूर्ण करण्याचे आदेश

ई-चलानद्वारे दंडात्मक रकमेचा भरणा प्रलंबित असलेल्या वाहनमालकांनी-एआय रिकव्हरी असिस्टंस् द्वारे ऑनलाईन पद्धतीने भरणा करावा..

ऑपरेशन प्रहारः अवैध मद्यविक्री प्रकरणी १२२ ढाबाचालक दोषी, लोकअदालतीत २६ खटल्यात ८ लाखांचा दंड वसूल…

vishwatmaklokswamivarta

सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईकरांच्या प्रशस्त घरांची होणार स्वप्नपूर्ती- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभादेवी परिसरातील सहा पुनर्विकासाच्या कामांची केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीसाठी-स्वित्झर्लंडच्या उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागत- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण प्रश्नी उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल डॉ. संजय लाखेपाटील यांची मािहती

vishwatmaklokswamivarta