vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार

नमुंमपा पद भरतीमधील ‘औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी’ पदाची अर्हता शासन नियमानुसार

 

      नवी मुंबई प्रतिनिधी    नवी मुंबई महानगरपालिकेची सरळसेवा भरती-2025 करिता 30 संवर्गासाठी 620 पदे सरळसेवेने टीसीएसमार्फत भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यामध्ये औषध निर्माता/ औषध निर्माण अधिकारी या संवर्गाची 12 पदे सरळसेवेने भरावयाची आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध संवर्गातील पदांचे भरती प्रमाण व सेवा अर्हता असलेल्या “नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2021” ला नगर विकास विभाग, शासन निर्णय दि.30.03.2021 अन्वये शासन मान्यता प्राप्त झाली आहे. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

       हे सेवा प्रवेश नियम नगर विकास विभाग, शासन राजपत्र दि.09.04.2021 नुसार प्रसिद्ध झाल्यापासून अंमलात आलेले आहेत. त्या अनुषंगाने शासन नियमानुसार सरळसेवा 100% प्रमाणानुसार औषध निर्माता/औषध निर्माण अधिकारी या पदाकरिता (अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.फार्म पदवी, (ब) महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948 (8 ऑफ 1948) नुसार वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक, (क) मेडिकल स्टोअरचा 2 वर्षांचा अनुभव आवश्यक, (ड) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक अशी अर्हता देण्यात आलेली आहे.

    सदर जाहिरातीतील औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी या पदासाठी विहित अर्हता ही महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या ‘नवी मुंबई महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, 2021’ यानुसार नमूद करण्यात आलेली आहे याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, तसेच सरळसेवा पदभरतीकरिता इतर संवर्गातील पदाकरिता अर्हता ही शासनाने विहित केल्यानुसार नमूद करण्यात आलेली आहे. असे नवी मुंबई महानगपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.

0000000

संबंधित पोस्ट

परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश • शस्त्रे जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

vishwatmaklokswamivarta

जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले श्री. ऋषिकेशदादा कराड साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ खरोळा गावामध्ये प्रचार रॅलीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

आज पाचवा दिवस पाचव्या दिवसाचे श्रीगणेश मूर्ती विसर्जन 🌸

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या मुख्यमंत्री विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या श्री मोरया प्रतिष्ठान च्या गणेश सभा मंडपाचे  उद्घाटन

पहिल्याच तिमाहीत ४३४ कोटींच्या मालमत्ता कर संकलनाव्दारे नवी मुंबईने महसूल व्यवस्थापनात नोंदविला नवा इतिहास*अदायगीच्या ऑनलाइन सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डेटा विश्लेषण आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे ऐतिहासिक यश*

खटाव व दहिवडी येथील मुलांच्या वसतिगृहाची प्रवेश प्रक्रिया सुरु