vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

देशी गोवंश संवर्धनासाठी जिल्ह्यात पात्र गोशाळांना 24 लाख 93 हजार रूपयांचे परिपोषण अनुदान…

देशी गोवंश संवर्धनासाठी जिल्ह्यात पात्र गोशाळांना 24 लाख 93 हजार रूपयांचे परिपोषण अनुदान…

        सांगली, प्रतिनिधी : सन 2024-25 पासून गोशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडील नोंदणीकृत गोशाळेत ठेवण्यात येणाऱ्या देशी गाईंना प्रतिदिन प्रति गोवंश रक्कम 50 रूपये परिपोषण अनुदान देण्याकरीता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील 11 पात्र गोशाळांना एकूण 24 लाख 93 हजार रूपयांचे पोषण अनुदान देण्यात आल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

 जिल्ह्यात एकूण 19 नोंदणीकृत गोशाळा आहेत. पशुसंवर्धन विभागाच्या समितीने गोशाळांची प्रत्यक्ष पाहणी करुन पडताळणी केली. त्यात 11 पात्र गोशाळांची निवड करण्यात आली. यामध्ये 3 वर्षावरील प्रत्येक देशी गाई प्रति दिन रक्कम रु.50/- पोषणासाठी अनुदान जाहीर करण्यात आले. शासनाने गोशाळांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी निधी उपलव्ध करुन दिला आहे. या उपक्रमाअंतर्गत 554 देशी गाईंना माहे जानेवारी 2025 ते मार्च 2025 या कालावधीकरीता 24 लाख 93 हजार रूपयांचे पोषण अनुदान महाराष्ट्र गोसेवा आयोगामार्फत थेट संबंधित गोशाळांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पांढऱ्या काठीमुळे दृष्टीहीनांना शारीरिक सुरक्षितता, आत्मविश्वास- जिल्हाधिकारी अशोक काकडे – पांढरी काठी दिनानिमित्त दिला अंध व्यक्तिला आधार

vishwatmaklokswamivarta

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य*- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*• मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या समन्वयाने विधानभवन येथे पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबीर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नवी मुंबईत ‘भारत टॅक्सी’ सेवेचा प्रारंभ

शालेय गुणवत्तेचा आराखडा अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे राबवावा – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा पहिल्यांदाच खासगी कारसाठी रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची सेवा सुरू

रायगड जिल्हा (तालुकानिहाय पावसाची नोंद) (मिमी)सकाळी ८:०० वाजेपर्यंत: