vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…जागतिक वारसा दिनानिमित्त उपक्रम

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…जागतिक वारसा दिनानिमित्त उपक्रम

 

गडचिरोली, प्रतिनिधी : जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील श्रीक्षेत्र मार्कंडा येथे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (नागपूर मंडळ) आणि आदिवासी आश्रम शाळा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन व स्वच्छता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना भारतीय वारसा स्थळांचे संवर्धन, इतिहासाचे महत्त्व व पुरातत्त्व विभागाचे कार्य याची माहिती यावेळी देण्यात आली.

या उपक्रमात मार्कंडा आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची मंदिर परिसरात शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली. सुमारे १२व्या शतकांपूर्वीच्या या प्राचीन मंदिर समूहाचे स्थापत्य वैशिष्ट्य, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि सांस्कृतिक मूल्य याविषयी पुरातत्त्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक शुभम कोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून जागतिक वारसा स्थळांची महत्त्व व त्याचे जतन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी, शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून परिसरातील प्लास्टिक, कचरा आणि इतर अनिष्ट घटकांचे संकलन केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत तसेच वारसा स्थळांचे जतन करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.

या उपक्रमात शाळेचे अधीक्षक अरुण राऊत, शिक्षिका कृपांती बोरसरे, छबिलदास सुरपाम तसेच पुरातत्त्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले. इतिहासाची ओळख व वारसा संवर्धनाच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि संस्काराचा अनुभव ठरला.

0000000

संबंधित पोस्ट

राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (उदा. ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी नवे नियम लागू

vishwatmaklokswamivarta

आदिवासी आमदार, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी घेतली राज्यपालांची भेटआदिवासी विकास निधी आदिवासी योजनांकरिताच वापरला जावा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

महाराष्ट्रात विशेष सखोल मतदार पुनरिक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल-देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

vishwatmaklokswamivarta

राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2024 साठी-प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

श्रीगणेशोत्सव २०२६’ च्या अनुषंगाने महापौर श्रीमती रितू तावडे आणि उप महापौर श्री. संजय घाडी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका पदाधिकारी, श्रीगणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी  अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta