vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार– राज्यमंत्री तथा परभणी पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

परभणीच्या पुरातत्व वारशाचे संवर्धन करून जागतिक स्तरावर नेणार– राज्यमंत्री तथा परभणी पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

राज्य प्रतिनिधी : परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंना योग्य त्या संवर्धनाची आणि विकासाची गरज आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन करून पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्यात येईल. या माध्यमातून परभणी जिल्ह्याचे सांस्कृतिक महत्त्व जागतिक स्तरावर नेता येईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी केले.

निर्मल भवन येथे परभणी जिल्ह्यातील पुरातत्व वास्तूंचे संवर्धन व विकास कामांचा आढावा राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर यांनी घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी पुरातत्व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी, सहायक संचालक अमोल गोटे व दुरदृश्य प्रणालीद्वारे परभणी जिल्ह्याचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

परभणी जिल्ह्यात असलेल्या सर्व बारवांना संरक्षित करण्यात यावे. चारठाणा गाव हेरिटेज गाव करण्यासाठी नियोजन करावे. तसेच धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिराच्या बाजूची जागा भूसंपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुरातत्व विभागाला सहकार्य करावे, अशी सूचनाही राज्यमंत्री श्रीमती साकोरे – बोर्डीकर यांनी केली.

संबंधित पोस्ट

शिष्यवृत्ती परीक्षेचा “शहापूर पॅटर्न” : नियोजन, सामाजिक सहभाग आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमातून घडले यश

मोटार वाहन निरीक्षकांचा जुलै ते डिसेंबर 2026 या कालावधीचा शिबिर दौरा कार्यक्रम

मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळाला उपाध्यक्ष अ.जावेद यांची भेट-विविध विषयाचा घेतला आढावा

बारवाले महाविद्यालयात ‘Flagship Programme’ कार्यशाळा उत्साहात पार पडली

vishwatmaklokswamivarta

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नवी मुंबईत विविध ठिकाणी देशी वृक्षरोपांची लागवड**पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनी सक्रीय पुढाकार घेण्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे आवाहन

एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेचे रविवारी आयोजन*12 हजारहून अधिक उमेदवार देणार परीक्षा…