vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशराजकारण

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन..

राज्य प्राथमिक-अहिल्यानगर,  माजी आमदार दिवंगत अरुण जगताप यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांत्वन केले. जगताप यांच्या निवासस्थानी भेट देऊन आमदार संग्राम जगताप, सचिन जगताप व कुटूंबातील अन्य सदस्यांचे सांत्वन केले.

यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, आमदार काशिनाथ दाते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अरुणकाका जगताप यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून सामान्यांची घट्ट नाळ जुळलेले कर्तृत्ववान नेतृत्व हरपले आहे. त्यांच्याशी अत्यंत निकटचे संबंध होते. सर्वांना सोबत घेऊन अत्यंत चोखपणे काम करण्याचा त्यांचा कटाक्ष होता. जगताप कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो, अशी प्रार्थना करत त्यांचे अपूर्ण काम पूर्णत्वास नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

संबंधित पोस्ट

सेवा हक्क अधिनियमाच्या दशकपूर्तीनिमित्त सेवा हक्क दिन*12 मे पर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन

संस्कार प्रबोधिनी प्राथमिक शाळेत मराठी भाषा दिन साजरा

vishwatmaklokswamivarta

सह आयुक्त डॉ. अनंत गव्हाणे सेवानिवृत्त सेवाकाळातील योगदानाचा गौरव..

अमृता सोपान शिंदेला सुवर्णपदक 

vishwatmaklokswamivarta

अन्नपदार्थ विक्री आस्थापना तपासणीसाठी 18 ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम- सहायक आयुक्त रावसाहेब समुद्रे- त्रुटी आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा

घरकुल, आरोग्यसह विविध सुविधांपासून कातकरी समाज वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन