vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

मुख्य निवडणूक आयुक्तांचा बहुजन समाज पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद

 

राज्य प्रतिनिधी -मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू व डॉ. विवेक जोशी यांनी निवडणूक सदन येथे बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा कु. मायावती यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधींशी संवाद साधला.

भारत निवडणूक आयोगाने विविध हितधारकांशी सातत्यपूर्ण व व्यापक संवाद साधण्यावर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने आयोगाने राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील राजकीय पक्षांशी थेट संवाद सुरू केला आहे. या संवादाद्वारे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाध्यक्षांना आपल्या सूचना थेट आयोगापर्यंत पोहोचवता येतील, यासाठी ही एक महत्त्वाची संधी ठरणार आहे.

सर्व संबंधित पक्षांच्या सहकार्याने विद्यमान कायदेशीर चौकटीत राहून निवडणूक प्रक्रियेला अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने आयोगाने हा पुढाकार घेतला आहे.आयोगामार्फत आतापर्यंत ४,७१९ सर्वपक्षीय बैठकांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये ४० मुख्य निवडणूक अधिकारी, ८०० जिल्हा निवडणूक अधिकारी आणि ३८७९ मतदार नोंदणी अधिकारी यांनी सहभागी होऊन २८ हजारांहून अधिक राजकीय प्रतिनिधींशी संवाद साधला आहे, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सांगलीच्या ‘माडग्याळ’ मेंढीला अखेर राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र देशी मेंढी जात म्हणून अधिकृत मान्यता!- ICAR-NBAGR कडून ॲक्सेशन नंबर प्रदान;- तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश- सांगली व परिसरातील मेंढीपालकांसाठी सुवर्णकाळ

इयत्ता पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर

जिल्हाधिकाऱ्यांकडून कारागृहाची पाहणी*कारागृह अभिविक्षक मंडळाची बैठक संपन्न

प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक रिपोर्ट-  मुंबई महानगरपालिकेच्या गैर कारभाराचा भांडाफोड-पालिका नागरिक सेवा पुरवठ्यात आघाडी मात्र पर्यावरण आणि हवामान बदलाच्या बाबत उत्तरदायित्वात पिछाडी, प्रजा फाउंडेशन च्या नागरिक अहवालामध्ये धक्कादायक आकडेवारी सादर

vishwatmaklokswamivarta

भारतीय ज्ञानपरंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम घडविणारे राष्ट्रीय शैक्षणिक केंद्र नाशिकमध्ये उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय संस्कृत विद्यापीठासाठी १६.८० हेक्टर जमिनीचा ७/१२ उतारा विद्यापीठाला सुपूर्द

vishwatmaklokswamivarta

जनगणना २०२७: नागरिकांसाठी १५ मे पर्यंत ‘स्व-गणना’ करण्याची संधी