vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

 

राज्य प्रतिनिधी-सिंधुदुर्गनगरी,) सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीही तडजोड न करता कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. कंत्राटदारांकडून योग्यप्रकारे कामे करून घेतली जावीत. मान्सूनपूर्व उपाय योजनांवर अधिक भर देत दुरूस्तीची कामे लवकरात लवकर संपवावी. पावसाळ्याच्या अनुषंगाने सर्व यंत्रणा तयार ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृह येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, प्रभाकर सावंत तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत करण्यात येत असलेल्या सर्व कामांमध्ये दर्जा राखण्यावर संबंधित यंत्रणांनी कटाक्षाने लक्ष द्यावे असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले. मंत्री भोसले म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा 100 दिवसांचा सात कलमी कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रभावीपणे काम करुन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. आता 150 दिवसांच्या कालावधीत गुणवत्तापूर्ण कामे करुन प्रथम क्रमांक पटकावयाचा असल्याने सर्वांनी त्यादिशेने काम करावे. कामांच्या गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड होऊ नये याची दक्षता घ्यावी. कामांच्या ठिकाणी झाडे लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्यात यावे असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील रस्त्यांची आणि पुलांची दुरूस्ती करण्याची मागणी केली असता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ती मागणी मान्य करुन तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागांच्या विविध कामांचा, प्रगतीपथावर असलेल्या उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यामध्ये दि.१४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन.

दिशा’ समितीची आढावा बैठक संपन्नजिल्ह्यातील विकासाची कामे तात्काळ पार पाडावी – खासदार डॉ.कल्याण काळे

vishwatmaklokswamivarta

महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचा येत्या दि.28 एप्रिल रोजी मुंबईत महामोर्चा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

उमेदच्या वतीने गुरूवारपासून पाचदिवसीय मिनी सरस प्रदर्शन  

vishwatmaklokswamivarta

जंगलात भटकू नका, मुख्य प्रवाहात या” — आत्मसमर्पित संगीता उर्फ ललिता यांचे नक्षलवाद्यांना भावनिक आवाहन

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन..     

vishwatmaklokswamivarta