vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

 

ठाणे, प्रतिनिधी:- गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून “जिओ पारसी योजना” राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. ही योजना केवळ आर्थिक सहाय्यपुरती मर्यादित नसून, ती वैचारिक, सामाजिक व वैद्यकीय मार्गदर्शनाचीही आहे. यामार्फत पारशी समाजाच्या अस्तित्वाचे संवर्धन आणि टिकाव सुनिश्चित करण्याचा शासनाचा उद्देश आहे.

धार्मिक अल्पसंख्यांक पारसी समुदायाच्या कल्याणासाठी “जिओ पारसी” ही केंद्रीय क्षेत्रातील योजना राबविण्यात येत आहे. “जिओ पारसी” या केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर समन्वय, मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येत आहे:

जिल्हास्तरीय समितीचे सदस्यःअध्यक्ष – जिल्हाधिकारी, ठाणेनिमंत्रित सदस्य – जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, ठाणे, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे, संबंधित क्षेत्रातील मान्यवर पारसी समाज प्रतिनिधी

सदस्य सचिव – जिल्हा अल्पसंख्यांक अधिकारी, ठाणे,समितीची कार्यकक्षाः

1. “जिओ पारसी” योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करणे.

2. ही समिती “जिओ पारसी” उपक्रमाच्या यशासाठी पारसी समाज व केंद्र शासन यांच्यामध्ये एक महत्त्वाचा दुवा असेल. या योजनेच्या लाभांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सल्लामसलत सत्रे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल.

3. ही समिती लाभार्थ्यांकडून प्रस्ताव प्राप्त करेल, डॉक्टर किंवा क्लिनिकच्या मदतीने त्यांचे मूल्यांकन करेल व उपचारासाठी पात्र लाभार्थ्यांची शिफारस करेल, तसेच भरपाईसाठी आलेल्या खर्चाच्या बिलांची तपासणीही करेल.

4. जिल्हास्तरीय समिती ‘HOC’ (Health of Community) घटकांतर्गत प्राप्त अर्जाचा विचार करण्यासाठी व शिफारस करण्यासाठी दर तीन महिन्यांनी बैठक घेईल.

5. जिल्हा समितीला खालील अधिकार असतीलः

i) सर्व अर्जांची छाननी करणे.ii) पडताळणी झालेल्या व निवडलेल्या HOC अर्जदारांची शिफारस मंत्रालयातील मंजूरी समितीकडे पाठविणे.

0000

संबंधित पोस्ट

आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन,विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन लेझीम, ढोल-ताशे, दिंडी पथकाच्या मिरवणुकीतून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना प्रकल्पपूर्वीसाठी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने गती द्यावी   – जिल्हाधिकारी अशोक काकडे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेकेसरेकर दाम्पत्याच्या मुलांचे शैक्षणिक पालकत्व- मुलांची भेट घेऊन केले सांत्वन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यास्पर्धा परीक्षा-2026 चे वेळापत्रक संकेत स्थळावर उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टी, पूर परिस्थितीत; मदत व बचाव कार्यास सर्वोच्च प्राधान्य,जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी शाळकरी विद्यार्थिनींनी रक्षाबंधननिमित्त राख्या बांधल्या आणि या सणाच्या शुभेच्छा दिल्या.